Tarun Bharat

विराट, रोहितचे वनडेतील स्थान कायम

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

भारतीय कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसी वनडे मानांकनात फलंदाजीतील आपली स्थाने कायम राखली असून ते पहिल्या व दुसऱया स्थानावर आहेत.

ऑस्ट्रेलियाची रनमशिन म्हणून ओळखल्या जाणाऱया स्टीव्ह स्मिथने कसोटी फलंदाजीतील अग्रस्थान कायम राखले असून विराट कोहली दुसऱया व स्मिथचा सहकारी मार्नस लाबुशेन तिसऱया स्थानावर आहे. टी-20 फलंदाजांच्या मानांकनात भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुल दुसऱया तर पाकचा बाबर आझम पहिल्या व ऑस्ट्रेलियाचा वनडे कर्णधार ऍरॉन फिंच तिसऱया स्थानी आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने वनडे गोलंदाजीतील अग्रस्थान राखले असून कसोटीत हे स्थान ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने आणि टी-20 मध्ये हे स्थान अफगाणचा स्पिनर रशिद खानने राखले आहे. सांघिक क्रमवारीत वनडेमध्ये भारत दुसऱया तर कसोटी व टी-20 मध्ये तिसऱया स्थानावर आहे. यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी पहिली दोन स्थाने पटकावली आहेत.

इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉलीने पाकविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत 267 धावांची शानदार खेळी केल्याने व जेम्स अँडरसनने गोलंदाजीत भरीव कामगिरी केल्याने कसोटीतील मानांकनातही त्यांची प्रगती झाली आहे. क्रॉलीने 53 स्थानांची प्रगती करीत 28 व्या स्थानी झेप घेतली आहे. गोलंदाजीत अँडरसनने पुन्हा टॉप टेनमध्ये स्थान मिळविले असून सहा स्थानांची प्रगती करीत तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय फलंदाजीत जोस बटलर 21, पाकचा अझहर अली 23, मोहम्मद रिझवान 72 व्या स्थानावर आहेत.

Related Stories

सानिया-नादिया उपांत्य फेरीत

Patil_p

कोंटावेट-फेरो यांच्यात अंतिम लढत

Patil_p

न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय

Patil_p

भारताची 15 सुवर्णांसह 39 पदकांची कमाई

Patil_p

पीव्ही सिंधू, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

राजस्थान, पंजाब, केकेआर संघांचे युएईमध्ये आगमन

Patil_p
error: Content is protected !!