Tarun Bharat

विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही : राजेश टोपे

मुंबई \ ऑनलाईन टीम

विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटलं आहे.

माध्यमांनी राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधनांशी चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असे सांगितले.दरम्यान, राजेश टोपे यांच्या या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी हवेत म्हणजे राष्ट्रीय बातमी होईल, असा संतप्त सवाल दरेकर यांनी केला आहे. राज्यातील आघाडी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्या आहेत. त्यामुळेच हे लोक बेताल बडबड करत आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याऐवजी यांना टीव्हीवर चमकायचं पडलं आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.

Related Stories

लालू प्रसाद यादव यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Tousif Mujawar

राज्यातील राजकीय सत्तानाट्य संपलं, बहुमताचा डाव शिंदे-भाजप गटाने जिंकला

Rahul Gadkar

पंकजा मुंडे यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र; त्या म्हणाल्या…

Tousif Mujawar

कोल्हापूर : जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल

Archana Banage

दिल्ली, एनसीआरमध्ये 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

prashant_c

भारतीय सीमेजवळ चीनचे हजारो सैन्य तैनात

datta jadhav