Tarun Bharat

विरोधकांकडून शेतकऱयांची दिशाभूल

पंतप्रधान मोदींचा कच्छमध्ये आरोप,  शीख नागरीकांशी केली ‘मत की बात’, आंदोलनकर्त्या संघटनांमध्ये फुटीची चिन्हे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपले मातृराज्य गुजरातच्या कच्छ भागाचा दौरा सुरू केला आहे. या दौऱयात त्यांनी तेथील शेतकऱयांशी चर्चा केली. विरोधक राजकीय स्वार्थासाठी शेतकऱयांची दिशाभूल करीत असून शेतकऱयांनी सावध असावे, असे आवाहन त्यांनी केले. एका कार्यक्रमात त्यांनी पंजाबमधून आलेल्या शीखांशीही नव्या कृषी कायद्यांसंबंधी त्यांच्यासमवेत बसून चर्चा केली. कायदे शेतकऱयांच्या हिताचेच असल्याचे त्यांनी ठाम प्रतिपादन केले. तसेच आंदोलनकर्त्यांशी चर्चेला नेहमीच सज्ज असल्याचेही स्पष्ट केले.

दुसऱया बाजूला दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन सुरूच आहे. हरियाणा-दिल्ली सीमेवर 60 हजार शेतकऱयांची उपस्थिती असल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली. स्थिती तणावग्रस्त असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या दिल्लीकडे येणारे महामार्ग वाहतुकीसाठी अंशतः बंद आहेत. दिल्ली-जयपूर महामार्गावर शेतकऱयांचे धरणे सुरू असून हा मार्गही काही प्रमाणात बंद आहे. मात्र, अन्य मार्गांचा उपयोग करून वाहतूक सुरू असल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून शेतकरी येत आहेत, असा दावा आंदोलकांनी केला. मंगळवार हा आंदोलनाचा सलग 20 वा दिवस होता.

आंदोलनात फुटीची चिन्हे

आंदोलन करणाऱया 13 संघटनांच्या समन्वय समितीत फूट पडल्याची चिन्हे आहेत. या समितीच्या बैठकीत दोन संघटनांच्या नेत्यांनी सरकारशी चर्चा करण्यास तयारी दर्शविली होती. मात्र, त्यांचे ऐकण्यात आले नाही, अशीही माहिती सूत्रांनी दिली. अनेक शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेऊन नव्या कायद्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करून समर्थन केले आहे.

सीमा बंद

हरियाणा आणि दिल्ली यांच्यातील सीमारेषा पूर्ण बंद करण्यता आली आहे. त्यासाठी जहाजातून मालवाहतूक करण्यासाठी उपयोगी टँकर्स आडवे घालण्यात आले आहेत. या टँकर्सवर उभे राहून पोलीस परिस्थितीवर लक्ष आणि नियंत्रण ठेवीत आहेत. आतापर्यंत तरी आंदोलन शांततेत चाललेले आहे.

शेतकऱयांना त्रास नाही

नव्या कायद्यांचा शेतकऱयांना कोणताही त्रास होणार नाही. आवश्यकता असल्यास आणि शेतकऱयांची मागणी असल्यास काही मुद्दय़ांमध्ये बदल करण्यात येतील. मात्र, कायदे रद्द करण्यात येणार नाहीत. शेतकऱयांनी आंदोलन थांबवून चर्चेला यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.  

चर्चा करण्याची तयारी

शेतकऱयांशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र कायदे मागे घेतले जाणार नाहीत. ‘होय किंवा नाही’ अशा पद्धतीने चर्चा होत नाही. आम्ही आंदोलकांना कायद्यांमधील सुधारणांचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर विचार करून त्यांनी चर्चेला येण्याची तयारी दर्शविल्यास आम्ही तयार आहोत. पंजाबच्या शेतकऱयांशी चर्चा करण्याही सरकार सज्ज आहे, ही सरकारची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केली.  

मंगळवारी दिवसभरात…

ड हरियाणा सीमेवर आणखी शेतकरी आल्याचा आंदोलकांचा दावा

ड काही आंदोलक संघटना सरकारशी चर्चा करण्यास आहेत तयार

ड उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात आंदोलक नेत्यांनी घेतल्या सभा

ड कायदे मागे घेतले जाणार नाहीत : सरकारकडून पुन्हा स्पष्टोक्ती

Related Stories

सीतारामन यांची एम्समध्ये तपासणी

Patil_p

काश्मीरमध्ये धडक कारवाई

Patil_p

मेट्रोमॅन श्रीधरनना भाजपकडून उमेदवारी

Patil_p

आता रेशनकार्डधारकांना मिळणार २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ

mithun mane

राष्ट्रपती कोविंद पुन्हा UP दौऱ्यावर; अयोध्येत रामललाचे घेणार दर्शन

Archana Banage

कोरोनामुळे जीव गमाविणाऱया पत्रकारांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत

Patil_p