Tarun Bharat

विरोधी पक्षनेते फडणवीस उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर

Advertisements

कोरोनाचा घेणार आढावा, जिल्ह्यातील चुकीच्या बाबींची होणार पोलखोल
सातारा / प्रतिनिधी

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 12 हजाराच्या जवळ पोहचला आहे.त्यातच बाधितांना बेड मिळत नाहीत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डात 24 तास डॉक्टर नाहीत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांना वैद्यकीय सुविधा योग्य पद्धतीने दिल्या जात नाहीत. खरी आकडेवारी जाहीर केली जात नाही, या बाबींचा पोलखोल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यावर करणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली आहे.


सातारा जिल्ह्यात मुख्य सातारा, कराड, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी या शहराबरोबरच ग्रामीण भागात जिल्ह्यातील 1500 गावांपैकी 777 गावात मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना सेंटरमध्ये सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांच्या तक्रारी आल्या आहेत.अनेक तक्रारी घेऊनच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कितपत सेवा देते याची माहिती घेऊन पोलखोल करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी पुणे येथून 3.00 वाजता सातारा येथे आगमन होणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) सातारा कोरोना सेंटरला भेट व रुग्णांची विचारपूस करणार आहेत.तेथून दुपारी साडे तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तेथून संध्याकाळी 5 वाजता कृष्णा हॉस्पिटल कराड येथे कोरोना सेंटरला भेट व रुग्णांची विचारपूस करणार आहेत. पुढे कोल्हापूरला जाणार आहेत, असे ही भाजपच्यावतीने सांगितले.

Related Stories

शिवसेनेचे नाव, चिन्ह गोठवण्याचा भाजपचा हेतू

Patil_p

सातारा जिल्ह्यात 290 नागरिकांना दिला डिस्चार्ज, 892 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

बारा फुटी पोट्रेट पाहून भारावले बच्चन

Patil_p

सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास ‘शूट अ‍ॅट साईट’ची ऑर्डर?

Abhijeet Shinde

वाई शहर मैलापाणी व्यवस्थापनात दिपस्तंभ: रोहित कक्कर

Patil_p

सातारा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायती बिनविरोध

datta jadhav
error: Content is protected !!