Tarun Bharat

विर्डी साखळीतील चार दिवशीय कळसोत्सवाला सोमवारी प्रारंभ.

Advertisements

8 एप्रिल रोजी प्रसिद्ध होमकुंड उत्सव. आज घोडेमोडणी, तोप, धुळवड साजरी केली जाणार

      डिचोली/प्रतिनिधी

  विर्डी साखळी येथील श्री सातेरी शांतादुर्गा देवीच्या कळसोत्सवाला आज सोम. दि. 5 एप्रिल रोजी पासून प्रारंभ होणार आहे. चार दिवस चालणाऱया या कळसोत्सवानंतर गुरू. दि. 8 एप्रिल रोजी विर्डी गावातील महादेव मंदिरासमोर वर्षपध्दतीप्रमाणे भव्य होमकुंड उत्सव साजरा करण्यात येणार आहे. विर्डी गावच्या 13 दिवशीय शिमगोत्सवाची होमकुंड उत्सवानंतर सांगता होणार आहे.

  या गावातील 13 दिवशीय शिमगोत्सवात नवव्या दिवशी सकाळी गावात घोडेमोडणी, तोप व नंतर धुळवड साजरी झाल्यानंतर संध्याकाळी श्री महादेव मंदिरातून वर्षपध्दतीप्रमाणे श्री सातेरी शांतादुर्गा देवीचा कळस वाजत गाजत भाविकांच्या उपस्थितीत बाहेर काढला जातो.

   सोम. दि. 5 एप्रिल रोजी संध्या. 4 वा. देवीचा कळस गाराणे घालून मंदिरातून बाहेर काढण्यात येणार. सर्वप्रथम मानाच्या देवतांना भेटी देऊन संध्याकाळी गावकरवाडा येथील मानाच्या घरांना भेटी देणार आहे. संध्याकाळी कळसाचे गावकरवाडा येथील पुरोहित सुदेव परांजपे यांच्या निवासस्थानी वास्तव्य राहिल.

   दुसऱया दिवशी मंगळ. दि. 6 एप्रिल रोजी सकाळी जल्मीवाडा येथील घरांमध्ये फिरणार. संध्या. 4 वाजण्याच्या सुमारास परबवाडा येथील घरांमध्ये फिरून सावळवाडा येथे गावची खुटी येथे भेट देऊन तिर्थ देणार आहे. त्यानंतर रात्री कारेखाजन विर्डी येथील अमर धुरी यांच्या निवासस्थानी कळसाचे वास्तव्य राहिल.

   बुध. दि. 7 एप्रिल रोजी तिसऱया दिवशी कारेखाजन येथील अमर धुरी यांच्या निवासस्थानी महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी कळस बाहेर काढण्यात येणार व कारेखाजन येथे घरांमध्ये फिरणार व देव क्षेत्रपाल, भुमिका देवी येथे भेट देणार. रात्री 10 वा. कौलोत्सव होणार. त्यानंतर शितळाई देवीला भेट देऊन तिर्थ देणार. रात्री पुर्ववत पुरोहित सुदेव परांजपे यांच्या निवासस्थानी वास्तव करणार.

    गुरू. दि. 8 एप्रिल रोजी चौथ्या दिवशी सकाळी कळस धाटवाडा येथील घरांना भेटी देणार. सायंकाळी च्यारीवाडा येथील घरांना भेटी देऊन झाल्यानंतर तेथे कौलोत्सव होणार आहे. त्यानंतर घाडीवाडा येथील घरांना भेटी दिल्यानंतर तेथेही कौलोत्सव होणार आहे. तत्पूर्वी घाडीवाडा येथे जाताना वाटेत व्याघ्रेश्वर देवाला देवी कौल देणार. घाडीवाडा येथे कौल दिल्यानंतर रात्री कळस भाटातून या पारंपरिक वाटेने महादेव मंदिराजवळ येणार. येथे रचून ठेवण्यात आलेल्या होमकुंडाला वळसा घालून देवीचा कळस देऊळवाडा येथील घरांना भेटी देणार. येथील घरांना भेटी दिल्यानंतर वाजत गाजत सर्व व्रतस्थ धोंडगणांच्या सथीने कळसाला होमकुंडस्थळी आणले जाणार.

   होमकुंडाला प्रदक्षिणा मारून देवी होमकुंडाला अग्नी देणार व सर्व धोंडगण कळसासह सातेरी शांतादुर्गा मंदिराजवळील तळीवर स्थानासाठी जाणार. पहाटे सर्वप्रथम सर्व धोंडगण व नंतर देवीचा कळस डोक्मयावर धरलेला मोडपुरूष होमकुंड मार्गक्रमण करणार व नंतर महादेव मंदिराच्या मंडपात सामुहिक कौलोत्सव होऊन देवीचा कळस पुर्ववत मंदारात प्रवेश करणार व या उत्सवाची सांगता होणार.

Related Stories

पाण्याच्या वाढीव बिलांच्या प्रश्नावर वास्कोत पुन्हा गदारोळ, गरीब व मध्यमवर्गीय चिंतेत

Amit Kulkarni

पर्तगाळी मठात रामजन्म सोहळा भक्तिभावाने

Amit Kulkarni

देशाच्या सशक्तीकरणात गोव्याची महत्त्वपूर्ण भूमिका!

Amit Kulkarni

आप-बाबाशानमध्ये पुन्हा धुमशाण!

Amit Kulkarni

शिक्षण संचालनालयातील कर्मचाऱयांसाठी आयोजित कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Patil_p

मुलगी, नातवाच्या भेटीसाठी गेल्या व शारजात अडकून पडल्या…

Omkar B
error: Content is protected !!