Tarun Bharat

विलगीकरण कक्षातील व्यक्तींचा मुक्त वावर

गाव कमिटीसमोर अनेक प्रश्न : स्वच्छतागृहासह सर्वच सुविधांचा वापर

प्रतिनिधी / कुडाळ:

शाळा, हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तींमधील काहीजण रात्रीच्या वेळी परिसरात फिरू लागल्याने गाव पातळीवरील समित्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहत आहेत. अशातच शाळा-हायस्कूलमधील स्वच्छतागृहासह सर्वच सुविधांचा वापर विलगीकरण कक्षातील व्यक्ती करीत असल्याने तसेच सर्वत्र वावरत असल्याने व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारे कर्मचारी, शिक्षक यांच्यासमोर आपण कुठे बसायचे?, स्वच्छतागृह कोणते वापरायचे?, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह बाहेरील लोक आपापल्या मूळ गावी येत आहेत. येणाऱयांची संख्या मोठी असून शाळांमध्ये सुविधा कमी आहेत. दिवसभर शाळेत राहिल्यानंतर काहीजण रात्रीच्यावेळी बाहेर फिरत असल्याच्या अनेक तक्रारी कुडाळ तालुक्यातील गावागावातून संबंधित यंत्रणेकडे येत आहेत. पोलीसही भेटी देऊन बाहेर फिरू नका, असे सांगत आहेत. मात्र, काहीजण कोणाचेही न ऐकता फिरताना आढळून येत आहेत.

          व्यवस्थापक-कर्मचाऱयांना ठरते गैरसोयीचे

गावात येणाऱया लोकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शाळेवर नेमलेले व्यवस्थापक व कर्मचारी यांना आपण कुठे बसावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक जास्त येत असल्याने त्यांचा वावर शाळा, हायस्कूलच्या परिसरात सर्वत्र वाढला आहे. शालेय कार्यालयेही ताब्यात घेण्यात येत आहेत. अशातच शाळा-हायस्कूलमध्ये स्वच्छतागृहांची संख्या मर्यादित असते. आलेल्या व्यक्तींनी सर्वच स्वच्छतागृहांचा वापर सुरू केला आहे. प्रत्येक कर्मचाऱयाने सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करू नये, असे प्रशासनाने जाहीर केल्याने व्यवस्थापक शिक्षक व कर्मचाऱयांनी कोणत्या स्वच्छतागृहाचा वापर करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गैरसोयीलाही सामोरे जावे लागत आहे. शाळा-हायस्कूलमधील सोयीसुविधा अपुऱया पडू लागल्या आहेत.

                 शाळेची कौले ठेवली काढून

तालुक्यातील एका गावातील शाळेत गावातीलच पण बाहेरून येणाऱयांना ठेवण्यात येऊ नये, यासाठी शाळेची कौलेच काढून ठेवण्यात आली. एका गावातील व्यक्ती मुंबई येथून आल्यावर राहायला गेला. मात्र, कौले काढलेली आहेत. दुरुस्तीचे कारण दाखवत त्याला दुसऱया शाळेत पाठविण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत गटशिक्षणाधिकाऱयांनाही कळविण्यात आले नाही. अशाप्रकारे शाळा व्यवस्थापन काम करीत आहे, तर वेंगुर्ले तालुक्यातील एका शाळेकडे जाणारी वाट बंद करण्यात आली आहे, याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

Related Stories

दोन मुलांसह ती महिला विहिरीत उडी घेणारच होती..!

NIKHIL_N

खेडमध्ये राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

Patil_p

मकरंद कशाळीकर यांना फार्मसिस्ट ऑफ दि इयर २०२१ हा सन्मान प्रदान

NIKHIL_N

ज्येष्ठ गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांचे निधन

NIKHIL_N

मसुरेतील पोलीस कर्मचारी बनले ग्रामस्थांसाठी देवदूत

NIKHIL_N

ओटवणे शाळा आणि हायस्कूल यांना रामचंद्र गावकर यांची देणगी व भेटवस्तू

NIKHIL_N