Tarun Bharat

विलगीकरण कक्षासाठी 15 व्या वित्त आयोगातून खर्च करण्यास मान्यता

सातारा / प्रतिनिधी :  

सध्या गावोगावी उभारण्यात येत असलेल्या विलगीकरण कक्षास खर्च करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून अबंधित निधीतून मान्यता देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विनय गौडा यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता गावोगावी सुरु करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षास अडचणी भेडसावणार नाहीत.  

कोरोनाच्या अनुषंगाने गावागावात उपचार घेण्याकरता विलगीकरण कक्ष उभारण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी कामे सुरु आहेत. त्या कक्षाच्या उभारणीसाठी 15 व्या वित्त आयोगातून निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार खर्च करताना अनावश्यक बाबींवर खर्च होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

कक्षास 15 व्या वित्त आयोगातून अबंधित प्राप्त निधीच्या 25 टक्के मर्यादेत खर्च करताना बेड, गादी, बेडशीट, उशी, ब्लँककेट, डसबीन, वॉटर हिटर, दिवाबत्ती सुविधा, कमोड टॉयलेट चेअर, 1 टक्के सोडियम हायपोक्लोराईड, फिनेल, सॅनिटायझेशन ऍसिड, बादली, सुपली, झाडू, पाण्  यासाठी जग, मग, पंखा, माहितीफलक, तात्पुरती बाथरुमची व्यवस्था, विलगीकरण कक्षाचे विजबिल, युरिन पॉट, पायपुसणी, लीड टॉर्च, इमर्जन्सी लॅम्प, साबण, हॅण्डवॉश, सलाईन स्टॅण्ड, पल्स ऑक्सीमीटर, डिजीटल थर्मामीटर, वाफारा मशिन, पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ग्लूकोमीटर, स्ट्रीप्स, लॅन्सेट, बी.पी. मॉनिटर, सॅनिटायझर स्टॅण्ड, ग्लोव्हज, मेडिसीन ठेवण्यासठी कपाट, इलेक्ट्रीक किटली, स्वच्छतागृह दुरुस्ती, विलगीकरण कक्ष दुरुस्ती, जंतूनाशक फवारणी मशिन, स्टेथेस्कोप, औषधे ठेवण्यासाठी ट्रे, बायोमेडिकल वेस्ट बिन, पोर्टेबल सक्शन पंप आदी वस्तु खरेदी करता येतील. शासनाच्या नियमांचे पालन करुन या वस्तू खरेदी कराव्यात, असे आदेश दिले गेले आहेत.

Related Stories

विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

Patil_p

सातारा : संत तुकाराम महाराज वारकरी संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी

Archana Banage

तुफानी पावसाने शौकिनांचा हिरमोड

datta jadhav

सभापतींच्या गावात सर्वसामान्यांवर अन्याय

datta jadhav

सातारा : महाबळेश्वर आगार वाहकाची आत्महत्या

Archana Banage

बंडातात्या कराडकर करवडीत स्थानबद्ध

Patil_p