Tarun Bharat

विवाहाची इतकी कसली घाई?

कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीने केला विवाह

विवाह रोखण्यासाठी गेलेले अधिकारी आशीर्वाद देऊन परतले

मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये एका विवाहाची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या विवाहातील नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह होता. याचमुळे वधू-वराने पीपीई किट घालून अग्निला साक्षी मानून 7 प्रदक्षिणा घालून विवाहाच्या बंधनात बांधले गेले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना विवाहाचे हे प्रकरण लोकांना हैराण करत आहे.

हा विवाह सोहळा रोखण्यासाठी प्रशासकीय पथक तेथे पोहोचले होते. परंतु घरातील ज्येष्ठांच्या विनवण्यांसमोर त्यांना झुकावे लागले आणि ते वधू-वराला आशीर्वाद देऊन परतले आहेत.

रतलाममधील अभियंता आकाश वर्माचा विवाह संजनासोबत निश्चित झाला होता. पण याचदरम्यान आकाशचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हा प्रशासनाने नवरदेवाच्या घराला कंटेनमेंट एरिया घोषित करत येण्या-जाण्याचे सर्व मार्ग रोखले. घरात होणाऱया सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली, पण घरातल्या लोकांनी विवाह सोहळा रद्द न करण्याचा निर्णय घेतला.

26 एप्रिल रोजी रतलामच्या सभागृहात विवाहाची पूर्ण तयारी झाली होती. याचा सुगावा लागताच तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी विवाह रोखण्यास सांगितल्यावर कुटुंबीय विनवणी करू लागले. कुठलाच अन्य मार्ग नसल्याचे पाहून प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करत विवाहाचे विधी पूर्ण करण्यास अनुमती दिली. पण वधू-वर पीपीई किट घालून विवाह करतील अशी अट घातली. दोन्ही बाजूकडुन एकूण 8 जण यात सामील झाले. कुटुंबीयातील अन्य लोकांनी व्हिडिओ कॉल करून नवदांपत्याला आशीर्वाद दिले आहेत.

Related Stories

वायुदलाला मिळाली क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा

Amit Kulkarni

वाढत्या प्रकोपापासून सावध व्हा!

Patil_p

तुर्कस्तानवर बहिष्काराची सौदी अरेबियाची घोषणा

Patil_p

कोरोना : पंजाबमध्ये मागील 24 तासात 60 मृत्यू, तर 3,187 नवे रुग्ण

Tousif Mujawar

भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाबळी

datta jadhav

कृषी कायदे २६ नोव्हेंबरपर्यंत मागे घ्या, अन्यथा…; राकेश टिकैत

Archana Banage