Tarun Bharat

विवाहित मुलीलाही अनुकंपा तत्वावर नोकरीची संधी

प्रतिनिधी / बेंगळूर

विवाहित मुलीला देखील अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी देता येते, असा महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नागप्रसन्न यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने निकाल दिला आहे. आतापर्यंत सरकारी सेवेत असताना कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत होती. तशी तरतूद कायद्यात आहे. मात्र, विवाहित मुलीला नोकरी मिळत नव्हती. यामुळे भेदभाव होत असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

भुवनेश्वरी पुराणिक यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने विवाहित मुलीला देखील अनुकंपा तत्वावर नोकरी देता येईल, असे सपष्ट केले आहे. सरकारी कर्मचाऱयावर अवलंबून असणाऱया कुटुंबातील पत्नीला, मुलगा, अविवाहित मुलगी, अविवाहित भाऊ किंवा बहिणीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत होती. मात्र, मृत कर्मचाऱयाच्या विवाहित मुलीला नोकरी दिली जात नव्हती. त्यामुळे रिट याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने विवाहित मुलीला देखील अनुकंपा तत्वावर नोकरी देता येते, असे स्पष्ट केले आहे.

Related Stories

कर्नाटकात ५३ हजार ८७१ सक्रिय रुग्ण

Archana Banage

माजी महापौर संपत राज यांना अखेर अटक

Patil_p

‘सारथी’ ला मिळतंय आर्थिक बळ

Archana Banage

कर्नाटक : आयएमडीचा काही भागात अतिवृष्टीचा इशारा

Archana Banage

अभिनेता चेतन कुमारविरुद्ध दोन एफआयआर दाखल

Archana Banage

कर्नाटकात सर्वाधिक देशद्रोहाचे गुन्हे दाखल

Archana Banage