Tarun Bharat

विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा

बेननस्मिथच्या माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा गौरव

बेननस्मिथ हायस्कूलच्या 1986 च्या बॅचच्यावतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षिका सुमन नाडगौडा यांचा सत्कार करण्यात आला. 35 वर्षांनंतर त्यांना सर्व विद्यार्थी भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सुमन नाडगौडा या सध्या 72 वर्षांच्या असूनही त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ओळखले. त्यांच्या कडक शिस्तीमुळे अनेक उत्तम विद्यार्थी घडू शकले. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे त्या आजही विद्यार्थ्यांच्या लक्षात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी 86 च्या बॅचचे सुनील मुरकुटे, अमर कारेकर, संजय मोरे, राजू लोंढे, विश्वनाथ बडे, राजू आळवणी यांच्यासह इतर उपस्थित होते.

आयुर जिमतर्फे गुरुजनांचा सत्कार

शहापूर येथील आयुर जिमतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थ्याच्या हस्ते गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. आयुर जिममध्ये गेली अनेक वर्षे व्यायामपटूंना प्रशिक्षण देणाऱया प्रशिक्षकांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी ही परंपरा जपत प्रशिक्षण देणाऱया गुरुजनांचा सत्कार कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. आयुर जिमचे प्रशिक्षक सुनील राऊत, राज्यस्तरीय शरीरसौष्ठव पंच श्रेयस गुरव व जोतिबा राजाई यांचा सत्कार मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित, देवण बामणे, यशवर्धन परदेशी, भक्ती हिंडलगेकर, अक्षता सावंत, खुशी गोटेवाडीकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर व बीडीबीबीआयचे अध्यक्ष एम. के. गुरव आदी उपस्थित होते.

भारत विकास प्रतिष्ठानतर्फे डॉ.सोनाली सरनोबत यांचा सत्कार

भारत विकास प्रतिष्ठानन घटप्रभा शाखेच्यावतीने डॉक्टर्स डे व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कर्नाटक राज्य उत्तर विभागाचे सेपेटरी स्वाती घोडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. सुजाता गुमास्ते यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय शाखा अध्यक्षा योगिता पाटील यांनी करून दिला. प्रतिभा हलप्पण्णावर यांनी गुरुपौर्णिमेविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी खजिनदार इंदिरा जोशी, ऋषा अवलक्की, सुधीर पाटील यांच्यासह इतरांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

वैष्णव सदन आश्रमात गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमेनिमित्त वैष्णव सदन आश्रम येथील गुरुवर्य मौनानंद हभप तुकाराम महाराज मुरगोड यांच्या समाधीचे पूजन हभप मारुती महाराज सांबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भजनाचा कार्यक्रम पार पडला. हभप बाबू होसुरकर, हभप लक्ष्मण येळ्ळूरकर, हभप बाळू केरवाडकर, अजित सांबरेकर, परशराम बुवा, यल्लाप्पा शहापूरकर, विशाल पाटील, राजू जायणाचे, गंगाराम यरमाळकर, बाळू घुमटे, संतोष जठार आदी उपस्थित होते.

गोंधळी गल्ली दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा

गोंधळी गल्ली येथील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गल्लीतील ज्येष्ठ नागरिक शंकर पावशे यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. उद्योजक रमेश मुतगेकर यांच्यामार्फत 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रामू नांगळे, सुरेश शिंदे, मिलिंद बेळगावकर, राजेश सावंत, शंकर कुरणे, गौरव कुलकर्णी, विकास चव्हाण, पराग शिंदे, अमित किल्लेकर, विजय रेवाळे, सुनील बांदेकर, अनिल गौंडाडकर, विजय नांगळे यांचे सहकार्य लाभले. दत्त भक्त श्रीधर मळीक यांनी मंदिराला देणगी देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

Related Stories

जमीनीच्या कब्जावरुन गौंडवाड येथे दोन गटात हाणामारी

Patil_p

शहर परिसरात संक्रांत साजरी

Amit Kulkarni

यमकनमर्डीत अज्ञाताकडून गोळीबार

Patil_p

कुद्रेमनी येथे आज मराठी साहित्य संमेलन

Patil_p

ग्रामीण भागात अघोषित वीजकपात

Amit Kulkarni

एपीएमसी बाजारात कांदा दरात वाढ

Omkar B