गोवावेस येथील सरकारी मराठी शाळा क्र.25


बेळगाव : गोवावेस येथील सरकारी मराठी शाळा क्र. 25 मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सुधीर नेसरीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिमापूजन गजानन सावंत यांनी केले. मोहनराव चिगरे यांनी श्रीफळ वाढविले. इनरव्हील क्लबतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी महापौर महेश नाईक, सतीश गावडोजी, गजानन शहापूरकर, कल्लाप्पा हंडे, शिक्षक एस. पी. मोडक, सी. ए. डायस, एस. डी. एम. सी. सदस्य मोहन घाटगे, रेखा पाटील, देवयानी के., संतोषी मुतगेकर, अंजना कुरंगे, भाग्यश्री पाटील, महेश गावडे, स्वाती कुलकर्णी, रचना शानभाग उपस्थित होत्या. आर. बच्चनट्टी यांनी सूत्रसंचालन केले.
जी.जी.सी. इंग्रजी माध्यमिक शाळा, टिळकवाडी


बेळगाव : टिळकवाडी येथील जी. जी. सी. इंग्रजी माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. रविराज पाटील, अध्यक्ष ऍड. चंद्रहास अणवेकर, गौरवाध्यक्ष सेवंतीलाल शाह, उपाध्यक्ष व्ही. एन. जोशी, डॉ. प्रकाश फडणवीस, दीपक जवळकर व मुख्याध्यापिका नवीना शेट्टीगार उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रतिमापूजन झाले. उपमुख्याध्यापिका स्वाती घोडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नवीना शेट्टीगार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थिनी सनया नाटेकर, अनुश्री रथकर यांची भाषणे झाली. तर ईशा वेर्णेकर हिने देशभक्तीपर गीत सादर केले.
शिक्षिका सपना शहापूरकर यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्ष व ट्रस्टींच्या उपस्थितीत ऍड. रविराज पाटील यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विनायक डिचोलकर यांनी केले. अश्विनी सराफ यांनी आभार मानले.
मळेकरणी हायस्कूल, उचगाव


बेळगाव : उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचालित मळेकरणी हायस्कूलमध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सेपेटरी जवाहर देसाई होते. नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य बंटी पावशे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. फोटोपूजन संचालक किशोर पावशे व जवाहर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी मान्यवरांचे स्वागत करून सध्या देशावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यातून सावरण्यासाठी सर्वांनी काळजी घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर देण्याची सूचना केली. यावेळी तेजस्विनी कोळेकर, ऋतुजा पाटील, माधुरी निट्टूरकर या विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. व्ही. एम. देसाई, उमेश उचगावकर, जी. के. तुप्पट, एस. एच. चौगुले यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रविणा देसाई यांनी केले. प्रतीक्षा भाट यांनी आभार मानले.
साईमंदिर भाजीमार्केट, टिळकवाडी


बेळगाव : साईमंदिर भाजीमार्केट, टिळकवाडी येथे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मर्चंट असोसिएशनचे नितीन भट यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यल्लाप्पा मास्तमर्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले. यावेळी सुभाष घोलप, परवेश पठाण, जयराव बांदेकर, बाळू खन्नूकर, राजकुमार सुलाखे, कुलकर्णी, चिदानंद तळवार, श्रीनिवास जवळकर, समशेर सौदागर, एम. बी. पांडे यांच्यासह परिसरातील व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
जयभवानी युवक मंडळ, येळ्ळूर
सुळगे (येळ्ळूर) : सुळगे (ये.) येथील श्री जयभवानी युवक मंडळाच्यावतीने 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण यल्लाप्पा बु. बस्तवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. फोटो पूजन यल्लाप्पा कणबरकर, प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
मच्छे येथील माजी सैनिक संघटना
बेळगाव : मच्छे येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने नियोजित कार्यालयाच्या जागेवर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय कार्यक्रमात मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांच्यावतीने ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक भिकाजी सावंत, ओमाण्णा जाधव, मल्लाप्पा अनगोळकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर नवीन माजी सैनिकांची संघटनेत नोंदणी करून घेण्यात आली. सालाबादप्रमाणे माजी सैनिकांच्या परिवारासाठी करण्यात येणारा हळदी-कुंकू समारंभही उत्साहाने करण्यात येतो. यावेळी माजी सैनिकांचे कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.
भाग्योदय महिला सोसायटी, उचगाव


बेळगाव : उचगाव येथील भाग्योदय महिला मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीमध्ये संस्थापक बी. एस. होनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली व संचालिका यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण चेअरपर्सन दीपाली दीपक नवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर फोटो पूजन सुशिला भरमा होनगेकर यांच्या हस्ते तर बी. एस. होनगेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी व्हा. चेअरपर्सन सिंधू एन. चौगुले, संचालिका सविता हुक्केरीकर, सुजाता पाटील, रेखा देसाई, विद्या देसाई, सविता देसाई, इंदिरा लोहार, सुवर्णा म्हेत्री उपस्थित होत्या. यावेळी सल्लागार अशोक हुक्केरीकर, बबन देसाई, नरसिंग देसाई उपस्थित होते. स्वागत व आभार मॅनेजर उषा लोकनाथ कावळे व कोमल वाळके यांनी केले.
सिद्धार्थ शिक्षण संस्थेची आराधना मतिमंद मुलांची शाळा


बेळगाव : सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे सदस्य ऍड. मनोहर कम्मार होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक गजानन एम. सुतार, क्रीडा शिक्षक आर. एच भाई, मारुती पी. कुंभार, डी. एस. पाटील, अश्विनी पवार, नंदा लोहार, किशोर जुवेकर, ऍड. एम. टी. पाटील व कृष्णा जोशी उपस्थित होते.
द. म. शिक्षण मंडळ संचालित व्ही.एस.पाटील हायस्कूल, मच्छे


बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक शिवाजीराव बी. पाटील यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन दिनेश लोहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुंडलिक कणबरकर यांनी केले. ध्वजारोहण शाळा इमारत बांधकाम समितीचे सदस्य भोमाणी बिर्जे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव मंगणाकर, माजी विद्यार्थी सागर कणबरकर, सुशांत कणबरकर, सुप्रिया कणबरकर उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन शिक्षक पी. एम. पाटील यांनी करून आभार मानले. याप्रसंगी सहशिक्षक ए. बी. पाटील, एस. एच. पाटील, एस. आर. कम्मार, जे. डी. बिर्जे, ए. पी. नाकाडी, आर. ए. देसूरकर, एस. एन. पाटील, पी. के. पाटील, के. बी. रंगाई, के. एस. सुळगेकर, संभाजी देसाई, अनिता गुंडोजी, नीता पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
गजानन महाराज भक्त परिवार केंद्र


बेळगाव ः श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे मंगळवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाहुराज घाटगे व रमेश फाटक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीधर मोहिते, रविंद्र कुलकर्णी, मालतेश पाटील, महेश पाटील, नाईक आदी उपस्थित होते.
सांबरा विमानतळावर देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य


बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळावर मंगळवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्त विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. यावेळी संचालक राजेशकुमार मौर्य यांनी विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेत प्रजासत्ताक दिनाचा उत्तम सोहळा आयोजित केल्याबद्दल कर्मचाऱयांचे कौतुक केले. व्हिजन फ्लाय या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक असे नृत्य सादर केले.
स्वामी विवेकानंद स्कूल, खानापूर


खानापूर : येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष जयंत तिनेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विद्यार्थिनी कु. नम्रता बसरगी हिने भाषण केले. या कार्यक्रमाला प्रकाश चौगुले, सेक्रेटरी ऍड. चेतन मनेरीकर, विकास वर्दे, संचालक आर. पी. जोशी, सदानंद कपिलेश्वरी, विकास जोशी, नारायण सुळकर, सुहास कुलकर्णी, दिलीप शहापूरकर, गुलाब जैन, सल्लागार व्ही. एम. बनोशी, प्रिन्सिपॉल श्रद्धा पाटील, प्रशासक दीपक सखदेव, शिक्षकवृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती पेडणेकर यांनी केले.
जिल्हा जनसेवा अभियान दल शाखा
बेळगाव ः येथील बेळगाव जिल्हा जनसेवा अभियान दल शाखेच्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जनसेवा अभियान दलाचे संघटक दीपक हळदणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सागर लोहार यांनी केले. तसेच स्वागतगीत समृद्धी हळदणकर यांनी गायिले. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला आकाश मुंचडीकर, रुक्मिणी मायाणाचे, रामलिंग नंदगडकर, चेतन पेडणेकर, श्रीधर लोहार, यल्लाप्पा गावडे यांच्यासह जनसेवा अभियान दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक


बेळगाव : एसकेई सोसायटी संचालित वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये मंगळवारी 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्राचार्या श्रीदेवी मालाज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्या मालाज यांनी कोरोना रोगावर लस शोधून काढणाऱयांचे कौतुक केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
सरस्वती हायस्कूल-बर्हिजी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालय


बेळगाव : दमशि मंडळ संचालित हंदिगनूर येथील सरस्वती हायस्कूल व बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालयाच्यावतीने 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन दीपक मारुती सुतार यांच्या हस्ते झाले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन के. के. पाटील यांनी केले. शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष निंगोजीराव हुद्दार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजस्तंभाचे पूजन उपाध्यक्ष पी. जी. पाटील यांनी केले. तर कल्लाप्पा कडोलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य पुंडलिक हेमाण्णा पाटील, परशराम नाईक, सदस्या माधुरी कल्लाप्पा पाटील, अनिता दत्तु चौगुले, उज्वला सुतार यासह उद्योजक दीपक सुतार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक दीपक सुतार यांनी त्यांचे वडील मारुती सुतार यांच्या हस्ते शाळेला 25,000 रुपयांची देणगी दिली. याप्रसंगी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, ग्रा. पं. चे आजी-माजी सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी, बर्हिजी शिरोळकर कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन जी. एस. पाटील यांनी केले. राजू पाटील यांनी आभार मानले.
महिला आघाडी को-ऑप. सोसायटी


बेळगाव : महिला आघाडीतर्फे महिला आघाडी को-ऑप. सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर संघटना-जायंट्स


बेळगाव : स्वातंत्र्यवीर संघटना, जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्यावतीने हुतात्मा स्मारक, हुतात्मा चौक येथे प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात पार पडला.अध्यक्षस्थानी दिलीप सोहनी होते. व्यासपीठावर स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे राजेंद्र कलघटगी, विठुकाका याळगी, परशुराम नंदिहळ्ळी, अशोक पोतदार, जायंट्सचे संजय पाटील, मोहन कारेकर, जायंट्स सखीच्या नीता पाटील, ज्योती अनगोळकर, नम्रता महागावकर, विनोबा गोलभवानी उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रथम हुतात्मा स्मारकाला ज्योती अनगोळकर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विनोबा गोलभवानी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तर मोहन कारेकर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रतिमेचे पूजन नम्रता महागावकर यांच्या हस्ते करण्यात आले. संजय पाटील आणि नीता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत आणि प्रास्ताविक परशुराम नंदिहळ्ळी यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत असताना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मधुरा गुरव यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्या पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील व्यापारीवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.