Tarun Bharat

विविध ठिकाणी महिला दिन साजरा

Advertisements

जीएसएस महाविद्यालय

एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ‘अमूल्य बुंद’ संस्थेच्या संस्थापिका डॉ. आरती भंडारे उपस्थित होत्या. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. नागराज हेगडे, प्रा. भारती सोलापूरमठ उपस्थित होत्या.

प्रारंभी सुस्मिता एस. जी. हिने इशस्तवन सादर केले. प्रगती योजना हिने स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. प्रा. चारुशीला यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. एन. डी. हेगडे यांनी प्रमुख पाहुण्यांना रोप देऊन त्यांचे स्वागत केले.

डॉ. आरती भंडारे यांनी स्वतःचे अनुभव सांगत स्त्री ही पूर्वीपासूनच कशी नेतृत्व करणारी आहे याबाबत सांगितले. महिला दिन हा फक्त 8 मार्च रोजीच साजरा न करता तो वर्षभर साजरा करावा. प्रत्येक स्त्री ही अद्वितीय आहे. त्यामुळे तिने प्रथम स्वतःला ओळखले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. डॉ. एन. डी. हेगडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रा. भारती सोलापूरमठ यांनी समारोप केला. शर्वरी कारेकर हिने आभार मानले.

आयओसी बेळगाव विभागीय कार्यालय

इंडियन ऑईल कॉपोंरेशनच्या बेळगाव विभागीय कार्यालयातर्फे व्यासराज पेट्रोलियम येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरती पवार, ज्योती तोराळकर या व्हीलचेअर बास्केटबॉलपटूंचा तसेच राष्ट्रीय सायकलपटू पूजा मुचंडी, भक्ती मुचंडी यांचा सत्कार करण्यात आला.

  यावेळी विभागीय विक्री व्यवस्थापक विनयकुमार उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. याचवेळी नवीन वर्ष आणि संक्रांत योजनेचे उद्घाटन करण्यात आले. मंगला मुतालिक यांना गाडीची चावी प्रदान करण्यात आली.

कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालय

कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्रा. मैत्रियेणी गदिगप्पगौडर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. तर अध्यक्षस्थानी बेळगावचे पोस्ट अधीक्षक एच. बी. हसबी उपस्थित होते.

प्रा. मैत्रियेणी यांनी महिलांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी एम. के. कोत्तल, आर. के. उमराणी, माया हसबे, एस. आर. जोशी यांच्यासह पोस्ट कर्मचारी उपस्थित होते.

जायंट्स मेन

चौकटीबाहेर पडून आपले अस्तित्व निर्माण करत घरची जबाबदारी पार पाडत महिलांनी स्वावलंबी बनावे, यासाठी काही आदर्शवत महिलांचा सन्मान जायंट्स मेनच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील आणि सचिव विजय बनसूर होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर सरिता पाटील उपस्थित होत्या.

जायंट्स मेनने ज्या महिलांचा सन्मान केला त्या समाजाला आदर्शवत अशाच आहेत. कारण सुनीता पाटणकर वयाच्या साठीनंतर सुद्धा महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहेत. महिलांनी अर्थकारण करत असताना स्वतः बचत करावी, यासाठी अनिता कणबर्गी या कार्यरत आहेत. तर अक्षता आळतेकर स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी धडपडत असतात. अशा महिलांचा सत्कार जायंट्स मेन करत आहे. ही गौरवास्पद गोष्ट आहे, असे सरिता पाटील म्हणाल्या. या तिघींचा सत्कार सरिता पाटील व संजय पाटील यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन केला.

जायंट्सच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. फेडरेशनचे संचालक शिवराज पाटील यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्या सरिता पाटील यांचे स्वागत संजय पाटील यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय शरद पाटील, भारत गावडे आणि पुंडलिक पावशे यांनी करून दिला. संजय पाटील यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत अध्यक्षीय समारोप केला. सुनील चौगुले यांनी आभार मानले.

मेक देम स्माईल फौंडेशन

मेक देम स्माईल फौंडेशनच्यावतीने अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. विशेष मुलांचा सांभाळ करणाऱया शाळांच्या कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. अंकुर व स्नेहालय स्पर्श शाळेच्या कर्मचाऱयांचा फौंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. अमूल्य बुंद फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. आरती भंडारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

प्रारंभी फौंडेशनचे अध्यक्ष सर्फराज खतीब प्रास्ताविकात म्हणाले, विशेष मुलांचा सांभाळ करताना त्यांना आईप्रमाणेच माया द्यावी लागते. त्यामुळे असे कठीण व कौतुकास्पद काम करणाऱया महिलांचा सन्मान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अंकुर स्कूलच्या स्मिता अंबेकर, छाया गावडे, मंगल बिर्जे, कविता कंग्राळकर, रुपाली जाधव, मनीषा शिंदे, स्नेहालयच्या संगीता बैलूरकर, कमला मांजलकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गायत्री गावडे, शाजी कुट्टी, अमर रोकडे, कलावती शेणवी उपस्थित होत्या.    

लोकमान्य सोसायटी, भाग्यनगर शाखा

लोकमान्य सोसायटीच्या भाग्यनगर शाखेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाखेच्या महिला व्यवस्थापक ज्योती गंभीर यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले. विभागीय कार्यालयातील छाया दोडमणी व सभासद श्रुती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

 या कार्यक्रमाला खातेदार रंजना पुणेकर, सोनिया आंबेवाडीकर, भारती पाटील, लीना अष्टेकर, श्रुती पाटील, स्नेहल पाटील, अनिता जाधव, वृषाली आंबेवाडीकर, संध्या गावडे, रजनी नाडगौडा, जान्हवी जांबोटकर, दीपिका तारीहाळकर, नमिता जांबोटकर, कोमल जाधव, साहाय्यक व्यवस्थापक निशांत जाधव, मयूर खटावकर, सुधीर कालकुंद्रीकर, विनोद नार्वेकर, भूषण बर्डे, सुधाकर धाडवे उपस्थित होते.

आविष्कार महिला उद्यमशील संस्थेतर्फे महिलादिन

कोणतेही शिक्षण कधीच वाया जात नाही. उद्योग क्षेत्रात काम करताना आपल्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग निश्चितच होतो. उद्योग यशस्वी होण्यासाठी साचेबद्धपणा टाळून सतत नावीन्यावर भर दिला पाहिजे, असे मनोगत पंख हॅण्डीक्राफ्ट्सच्या संचालिका गौरी मांजरेकर यांनी व्यक्त केले.

 आविष्कार महिला उद्यमशील संस्थेतर्फे मंगळवारी दुपारी वरेरकर संघाच्या सभागृहात महिलादिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून गौरी मांजरेकर बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थाध्यक्षा सुलभा खानोलकर उपस्थित होत्या.

गौरी म्हणाल्या, आपल्यासमोर आव्हाने आली की आपण जागरुक होतो. कोरोनाने आपल्यासमोर असेच आव्हान उभे केले. महिला नेहमीच आव्हानांचा सामना करतात. 2008 मध्ये चिकोडी व परिसरातील महिलांसाठी आपण पंख ही संस्था सुरू केली व त्यांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. अर्थात प्रारंभी महिलांचा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु तुम्ही यातून अर्थार्जन करू शकता हे पटवून दिल्यानंतर त्या तयार झाल्या.

याच बरोबरीने पंख हॅण्डीक्राफ्ट्स संस्था सुरू करून महिलांना हस्तकलेचे  विनामूल्य शिक्षण दिले. लग्नाची आमंत्रण पत्रिका कापडावर तयार केली, जेणेकरून पुन्हा ही पत्रिका रुमाल म्हणून वापरता येईल. लहान मुलांसाठी ‘किडी पॅक’चे वितरण केले जाते. विद्यार्थ्यांना आवश्यक असे साहित्य, उबदार कोट दिला जातो. ‘हॅपिपॅक्स, ब्लँक्sाsढट्स ऑफ लव्ह’ हे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मदत केली जाते. कन्यावर्धन योजनेंतर्गत विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते व नव्यानेच ऑनलाईनद्वारे पंख पाठशाला सुरू झाली आहे, असे त्या म्हणाल्या.

सुलभा खानोलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अपर्णा सामंत यांनी केले. 

एस.जी.बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महिला दिन

एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अडीचशेहून अधिक विद्यार्थिनी व महिला कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. डॉ. नीता देशपांडे, सेंट पॉल्स पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पद्मिणी रविंद्रन कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना डॉ. नीता देशपांडे म्हणाल्या, शारीरिक-मानसिक सुदृढता हवी असेल तर प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे, असे सांगितले.

सेंट पॉल्स पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पद्मिणी रविंद्रन यांनी देशाच्या विकासातील महिलांचे योगदान या विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. डॉ. एफ. व्ही. मानवी यांनी गृहिणींविषयी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सिद्धरामप्पा इट्टी होते. विद्यार्थिनी शिल्पा पालनकर हिने सर्वांचे आभार मानले.

व्हेगा हेल्मेट्सतर्फे महिला दिन साजरा

उद्यमबाग येथील व्हेगा हेल्मेट्स येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महिलांनी महिलांसाठी तयार केलेल्या देवी हेल्मेटचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून जीवन विमा निगमच्या एजंट स्मिता कुलकर्णी व एड्सग्रस्त अनाथ मुलांसाठी संस्था चालविणाऱया कस्तुरी माळी उपस्थित होत्या. कार्यकारी संचालक दिलीप चिंडक यांनी स्वागत करून महिला कर्मचाऱयांच्या कामाची प्रशंसा केली.

यावेळी 30 वर्षांहून अधिक काळ व्हेगामध्ये प्रामाणिकपणे काम केलेल्या महिला कर्मचाऱयांचा संगीता चिंडक, शालिनी चिंडक व अलका चिंडक, संजना चिंडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संरक्षणासाठी सर्व महिलांना व कर्मचाऱयांना विविध प्रकारच्या दोन हजार रोपांचे वितरण करण्यात आले.

यावेळी महिला कर्मचाऱयांनी गायन, नृत्य व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. व्हेगा हेल्मेट ही हेल्मेटचे उत्पादन करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असून येथे दोन हजारांहून अधिक महिला काम करतात. याप्रसंगी गिरीधारी, सुहास, कुणाल चिंडक उपस्थित होते.

लोकमान्य सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये महिला दिन साजरा

लोकमान्य सोसायटीच्या सर्व शाखांच्यावतीने शाखा कार्यालयांमध्ये ग्राहकांसमवेत महिला दिन साजरा करण्यात आला. कर्मचारी महिलांनी उपस्थित ग्राहक महिलांना महिला दिनाचे शुभेच्छापत्र व गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. ज्ये÷ सदस्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. सर्वांना अल्पोपाहार देण्यात आला. 

Related Stories

ऐश्वर्या हिट्टणगी यांना पीएचडी प्रदान

Amit Kulkarni

शाकंभरी पौर्णिमा साधेपणाने साजरी

Amit Kulkarni

लक्षणे नसलेल्या रुग्णांवर होणार स्वतंत्र उपचार

Patil_p

अडीच हजारांहून अधिक स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह

Patil_p

स्वातंत्र्य दिनः कर्नाटकच्या ४ पोलिसांना गृहमंत्री पदक

Abhijeet Shinde

मंगळवारी जिह्यात 18 जण पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!