Tarun Bharat

विविध ठिकाणी संभाजी महाराजांना अभिवादन

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने सोमवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या बलिदान मासाची सांगता झाल्याने संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, पिराजी शिंदे, प्रवीण तेजम, के. पी. पाटील, राजू तुडयेकर, राजकुमार बोकडे, दत्ता जाधव, तानाजी पावशे, प्रकाश राऊत, प्रकाश हेब्बाजी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित
होते.

शिवछत्रपती सेवा संघ

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 332 वी पुण्यतिथी गांभीर्याने पाळण्यात आली. साईराज चौगुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी, विनायक चौगुले, बाळकृष्ण घाटकर, प्रथमेश चौगुले, रवी कोकितकर, दयानंद कडोलकर, गौरी चौगुले, लक्ष्मी चौगुले, भावेश चौगुलेसह शिवप्रेमी उपस्थित होते.

संभाजीनगर वडगाव

संभाजीनगर वडगाव येथील गणेश मंदिर सांस्कृतिक ट्रस्ट व धर्मवीर संभाजी युवक मंडळाच्यावतीने संभाजी महाराजांचा बलिदान दिन गांभीर्याने आचरणात आणला गेला. यावेळी अभिजित केसरकर, नारायण केसरकर, गुरुनाथ पाटील, श्रीधर जाधव, परशराम नावगेकर, गोकुळ अकणोजी, धोंडिबा मोहिते, अमित सैनूचे, जयानंद कदम, महादेव मोरे, मारुती खोराटे, महेश लाड, राजू चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Stories

बेळगाव जिल्हय़ाचा निकाल 87.80 टक्के

Omkar B

येळ्ळूरमध्ये आज लोकमान्य केसरीसाठी कुस्ती मैदान

Amit Kulkarni

जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात समस्यांचा डोंगर

Amit Kulkarni

काही भागात काजू फळधारणेस प्रारंभ

Patil_p

10 हजारहून अधिक बसपास विद्यार्थ्यांच्या हातात

Amit Kulkarni

राज्य राखीव दलातील 579 अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदक

Patil_p