प्रतिनिधी / बेळगाव
म. ए. समितीच्या कोरोना आयसोलेशन सेंटरला बेळगाव शहरातील विविध को-ऑप. बँकांनी आर्थिक मदत केली आहे. मराठा बँकेने 25 हजार रुपये, तुकाराम बँकेने 21 हजार रुपये तर पायोनियर बँकेने 15 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
लोकसहभागातून म. ए. समितीने आयसोलेशन सेंटर सुरू केले होते. त्याला मदतीचा हात दिला जात आहे. तुकाराम बँकेचे ज्येष्ट संचालक प्रदीप ओऊळकर यांनी निधीचा धनादेश मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर, बाळू जोशी, परिन जाधव, प्रताप जाधव उपस्थित होते.