Tarun Bharat

विविध महामार्गांच्या कामांचा आज नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या शुभारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी व मुख्यमंत्री बसवराज बोम्माई सोमवार दि. 28 फेब्रुवारी रोजी बेळगाव दौऱयावर येत आहेत. 3 हजार 972 कोटी रुपये खर्चून 238 किलोमीटर लांबीचा महामार्ग निर्माण करण्यात येणार आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडांगणावर या महत्त्वाकांक्षी योजनेला चालना देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते योजनेला सुरुवात करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी भाग घेणार आहेत.

बेळगाव ते संकेश्वर, संकेश्वर ते महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सहापदरी महामार्ग निर्माण करण्यात येणार आहे. याबरोबरच चोर्ला-जांबोटी-बेळगाव दरम्यानच्या दुपदरी रस्त्याच्या कामालाही चालना देण्यात येणार आहे. विजापूर-मुरगुंडी, सिद्धापूर-विजापूर रस्त्याच्या कामांनाही सुरुवात होणार आहे. बेळगाव येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री व दोन्ही केंद्रीय मंत्री हुबळीला रवाना होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडांगणावर सर्व तयारी करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी आदी वरि÷ अधिकाऱयांनी रविवारी बंदोबस्ताचा आढावा घेतला.

Related Stories

जवान देशिंगे यांच्यावर अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

रॅलीमधून ‘फिट इंडिया’चा संदेश

Patil_p

हेळवी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mithun mane

प्रशासनातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

Amit Kulkarni

शहराला लवकरच जादा पाणीपुरवठा

Patil_p

शिवबसवनगर जोतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त पूजा

Patil_p
error: Content is protected !!