प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र व राज्य शासन शिक्षक कर्मचारी व कामगारiच्या विरोधात अनेक धोरणे राबवत आहे. याला विरोध करण्यासाठी आखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघ व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने देशव्यापी निषेध दिन पाळण्यात आला. राज्यसमन्वय समितीची घटक संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथ. शिक्षक सेवक समितीच्या वतीनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचेकडे पाठविणेसाठी विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मा. भाऊसाहेब गलांडे यांचेकडे दिल्याची माहिती प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली. यावेळी राज्य संपर्क प्रमुख आनंदा हिरूगडे हे उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे अनुकंपा तत्वावरील पदाबरोबर इतर रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोविड ड्यूटीवर मरण पावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना ५० लाखांची मदत मिळावी, कोविड आजाराचे कारण सांगून म.भत्ता गोठविणे, पगार कपात करण्याचे धोरण मागे घ्यावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांचा देशव्यापी निषेध दिन
Advertisements