Tarun Bharat

विविध मागण्यांसाठी अक्षरदासोहच्या कर्मचाऱयांचा मोर्चा

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक राज्य अक्षरदासोह नोकर संघ (सीआयटीयू) राज्य समितीतर्फे कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करावी, सेवानिवृत्ती पेन्शन द्यावी, अशा मागणीसाठी संघातर्फे दि. 3 फेब्रुवारी रोजी बेंगळूर येथे मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चामध्ये महिलांना सहभाग होऊ दिले नाही. अक्षरदासोह महिलांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

प्रशासनाने याचा विचार करून अक्षरदासोह कर्मचाऱयांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशा मागणीचे निवेदन अक्षरदासोह नोकर संघाच्या महिलांनी शुक्रवारी तहसीलदार गेड-2 व्ही. एम. गोटेकर यांच्याकडे दिले.

बेंगळूर येथील मोर्चात अक्षरदासोहाच्या महिलांना सहभागी होऊ दिले नाही. मोर्चा दरम्यान काहींना अटक करून गुन्हे दाखल केले. त्याबरोबरच मोर्चा रद्द झाला आहे, असे सांगून मोर्चापासून दूर ठेवले. त्यामुळे महिला कर्मचाऱयांना आपल्या समस्या व मागण्या मांडण्यात आल्या नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे.

अक्षरदासोहमधील कर्मचाऱयांना तुटपुंजे वेतन दिले जाते. त्याबरोबर निवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगावे लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी मंदा नेवगी, मिनाक्षी धपडे, शोभा चांदेकर, रेखा चौगुले, रुपा काकडे, मंगल सुगते, श्रृती सावंत, रत्ना नभापुरे, शिला बोमण्णावर, मनीषा जाधव, कोलकार आदी महिलांनी तहसीलदारांना निवेदन दिले..

Related Stories

लिंगराज महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस साजरा

Omkar B

हंदिगनूर येथील 10 वर्षाच्या बालकाला कोरोना

Tousif Mujawar

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे सुयश

mithun mane

हॉस्पिटलमधील बेडची कमतरताही कृत्रिम : बीबीएमपी आयुक्त बी.एच. अनिल कुमार

Archana Banage

महांतेशनगरमधील ड्रेनेजवाहिनीच्या समस्येकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

हालगा येथील मोहरमला साधेपणाने सुरुवात

Patil_p