Tarun Bharat

विविध मागण्यांसाठी विणकरांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

कर्जमाफी करा, वृद्धापकाळात पेन्शन सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

विणकरांना बिनव्याजी कर्ज द्यावे. सन्मानित योजना लागू करावी, विमा संरक्षण लागू करावे, ओळखपत्र द्यावेत, वीज बिलाला कमी दर द्यावा यासह इतर मागण्यांसाठी चिकोडी, निपाणी आणि माणकापूर येथील विणकर मालक व कामगार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन दिले.

कोरोनामुळे विणकर व्यवसाय अडचणीत आला आहे. देण्यात आलेले कर्ज माफ करावे, मल्टिस्टेट बँकांमधीलही कर्ज माफ करावे, महत्त्वाचे म्हणजे नव्याने बिनव्याजी कर्ज मंजूर करावे, वृद्धापकाळात पेन्शन लागू करावी, लाईट बिल माफ करावे तसेच आता 1.25 पैसे प्रतियुनिट प्रमाणे वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

माग व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आला आहे. या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. कोरोना काळात विविध समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने दहा लाख रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कर्जमाफी सरसकट करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

यावेळी अर्जुन कुंभार, लक्ष्मण धोनवाडे, चंद्रशेखर गुळगुंडे, अण्णाप्पा नागराळे, रमेश मोरे, रावसाहेब मोरे, सुरेश कुंभार, शाहीर कुंभार, सुनील कुंभार यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

तुम्मरगुद्दी पंपहाऊसमध्ये गळती

Omkar B

तिसरे उड्डाणपूल : काँक्रिटीकरणासाठी काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीच्या कामांबाबत तीव्र संताप

Amit Kulkarni

कोरोना रुग्णाला तहसीलदार, डीवायएसपींकडून जीवदान

Patil_p

गणेशोत्सवासाठी पाच दिवसांचा नियम शिथिल

Amit Kulkarni

…. आणि प्रशासनाला आली खडबडून जाग!

Tousif Mujawar