Tarun Bharat

विविध मागण्यांसाठी विणकरांनी दिले निवेदन

आत्महत्या केलेल्या विणकरांच्या कुटुंबांना दहा लाख द्या

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनामुळे विणकर व्यवसाय अडचणीत आला आहे. काम नसल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. काम नसल्याने अनेकांनी आपले जीवन संपविले. राज्यात 26 विणकरांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना किमान 10 लाख रुपये द्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय विणकर सेवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

राज्यामध्ये जवळपास 5 ते 6 लाख विणकर आहेत. एकूण 60 ते 66 लाख जनता या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. महापूर, जीएसटी, नोटाबंदी, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आम्ही विणकर संकटात सापडलो आहे. विवाह समारंभ रद्द झाले, विविध कार्यक्रम रद्द झाले, त्यामुळे खरेदीदारही कमी झाले आहेत. या समस्येमुळे 26 जणांनी आत्महत्या केली. विणकर समाज हा अत्यंत मागासलेला समाज आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्टय़ा हा समाज दुर्लक्षित आहे. व्यवसाय नसल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. मायक्रो फायनान्सधारक व्यावसायिकांना नाहक त्रास देत आहेत. तो थांबणे गरजेचे आहे. 55 वर्षे झालेल्या विणकरांना मासिक 5 हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवलिंग टिरकी यांच्यासह इतर विणकर उपस्थित होते.

Related Stories

अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 12 बकऱयांचा फडशा

Amit Kulkarni

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जहीर

Patil_p

रास दांडिया मध्येही थिरकली तरुणाई

mithun mane

जीवनदीप फौंडेशनतर्फे महावीर जयंतीनिमित्त मिठाई वितरण

Patil_p

शिवाजी नाही घडविता आला, तानाजी तरी घडवा!

Patil_p