Tarun Bharat

विविध संघ-संस्थांतर्फे बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

वार्ताहर/ उचगाव

उचगाव परिसरातील अनेक साहित्यिक संस्था, वाचनालये व शिक्षण संस्थांच्यावतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

उचगाव मराठी साहित्य अकादमी व उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम-पाटील, सेपेटरी एन. ओ. चौगुले व  अकादमीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघ, सुळगा-हिंडलगा यांच्यामार्फत शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील होते.

मळेकरणी हायस्कूल

मळेकरणी हायस्कूलच्यावतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनचरित्रावरील अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

रामलिंग हायस्कूल

तुरमुरी येथील रामलिंग हायस्कूलच्यावतीने मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.  

Related Stories

शक्तिशाली भूकंपात हैतीमध्ये 1,300 बळी

Patil_p

विणकरांच्या खात्यात जमा होणार 5 हजार रुपये

Patil_p

“सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होण्याच्या मार्गावर – सरन्यायाधीश

Abhijeet Khandekar

नवे शैक्षणिक धोरण क्रांती घडवेल!

Patil_p

ISRO ने रचला इतिहास; बाहुबली ‘LVM-3’चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

datta jadhav

महिला दिन : ‘या’ महिलेने केले मोदींच्या ट्विटरवरून पहिले ट्विट

tarunbharat