तरुण भारत

विवो भारतात उत्पादन क्षमता वाढविण्याच्या तयारीत

दुबई

स्मार्टफोन कंपनी विवो भारतामध्ये आपली उत्पादन क्षमता वाढवत  असल्याचे समजते. चालू वर्षात भारतात स्मार्टफोन निर्यात सुरु करण्याची तयारी  असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.  कंपनी आपल्या प्रमुख उपकरणांमध्ये एक्स80 श्रेणी भारतात निर्मिती करणार आहे. कंपनी भारतामध्ये आपल्या उत्पादनांची क्षमता वाढवून वार्षिक सहा कोटी उपकरण इतकी करणार आहे. 2021 मध्ये कंपनीची उत्पादन क्षमता पाच कोटी होती अशी माहिती विवो इंडियाचे संचालक पैगाम दानिश यांनी दिली आहे.  चालू वर्षात भारतात निर्यात सुरु करणार असून आगामी काळात उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार आहे. यामध्ये भारतीय बाजाराची मागणी पूर्ण करण्यासह मेड इन इंडिया उत्पादनांची निर्यातही करणार असल्याचे दानिश यांनी स्पष्ट केले आहे. विवोची 2022 मधील पहिल्या तिमाहीत भारताची स्मार्टफोन बाजारातील हिस्सेदारी 15 टक्के होती.

Advertisements

Related Stories

ठेवींवरचे व्याजदर वाढणार

Patil_p

एप्रिलमध्ये इंधनाची मागणी घटणार

Omkar B

नवीन सात कंपन्या 15 ऑक्टोबरपर्यंत होणार सुरू

Patil_p

टोयोटा वाढवणार कार्सच्या किमती

Patil_p

एनटीपीसीचे वीज उत्पादन 13 टक्के वाढले

Patil_p

इंडिगोची दोन आसने बुकींगची विशेष योजना

Patil_p
error: Content is protected !!