Tarun Bharat

विशांती कौठणकर यांचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतकडून अभिनंदन

प्रतिनिधी/म्हापसा

गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांनी सध्याच्या कोविड 19 या महाभयंकर परिस्थितीत यूएई मधील अडकलेल्या गोमंतक लोकांसाठी मदत केल्याबद्दल विशांती निलेश कौठणकर यांचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले.

विशांती कौठणकर या गोव्यातील म्हापसा येथील रहिवासी असून सध्या त्या दुबईमध्ये गेल्या 14 वर्षापासून राहत आहेत. त्या स्वतःची एचआर कन्सल्टन्सी कंपनी चालवित आहेत. त्यांनी अनेक गरजू लोकांना निशुल्क रोजगार उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या स्वतः लाईफ कोच, एनएलपी कोच असून कित्येक जणांना मोफत मार्गदर्शन करत आहेत. सध्या कोविड 19 परिस्थितीमुळे गोव्याचे बरेच रहिवासी हे यूएईमध्ये अडकून पडले होते त्यात काही वयस्कर, आजारी तर गरोदर महिलांचा समावेश होता. यासाठी विशांती यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी फेझ 2 आणि फेझ 3 साठी वंदे भारत मिशन अंतर्गत विमानाची व्यवस्था केली. यामध्ये विदेशी आयुक्त नरेंद्र सावईकर, विपुलजी इंडियन कन्सुलेट, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर यांची मोलाची मदत झाली.

याशिवाय यात सौ. लीना शतगावकर, श्री. मयेकर यांनीही अनमोल साथ दिली. विशांती यांनी अडकलेल्या गरजवंतासाठी किराणा, औषध व गरजूसाठी तिकीट व्यवस्था करणाऱयांमध्ये श्री. विजयजी, श्री. हॅन्सन, विवेक डिसोझा यांचीही मोलाची साथ मिळाली.

Related Stories

राज्यात ‘ब्लॅक फंगस’चे 10 रुग्ण

Amit Kulkarni

वजन माप खात्याची फोंडय़ात दोन दुकानावर धाड

Amit Kulkarni

म्हादई प्रश्नाला काँग्रेस जबाबदार

Amit Kulkarni

जेटी बंदर कप्तान खात्याच्याच अखत्यारित असणे गरजेचे

Amit Kulkarni

कुर्डी सहकारी सेवा संस्थेवर मास्कारेन्हस पॅनलची सरशी

Patil_p

‘हॅकाथॉन’ विद्यार्थ्यांसाठी सर्व क्षेत्रात रोजगारांच्या संधी निर्माण करील- मुख्य सचिव पुनीतकुमार गोएल

Amit Kulkarni