Tarun Bharat

विशाखापट्टणमध्ये वायूगळती

तीन दिवसात दुसऱयांदा वायूगळती : 2 ठार

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये मंगळवारी सकाळी एका कारखान्यात वायूगळती झाली आहे. या दुर्घटनेत दोन कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सेनर लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. तेथे बेन्जीमिडेजोल वायूची गळती झाली आहे. मुख्यमंत्री सी. जगनमोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सुमारे 2 महिन्यांमध्ये वायूगळतीची ही तिसरी घटना घडली आहे.

8 मे रोजी विशाखापट्टणमनजीक एका प्रकल्पात वायूगळती झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर चालू महिन्यात 27 रोजी कुर्नूल येथे झालेल्या दुर्घटनेत कंपनीच्या व्यवस्थापकाला जीव गमवावा लागला होता.

Related Stories

मध्यप्रदेशात ‘द बर्निंग ट्रेन’

Patil_p

चेक बाउन्स रोखण्यासाठी नवा नियम येणार

Patil_p

रामाशिवाय भारत अपूर्ण – उच्च न्यायालय

Patil_p

गव्हाचा साठा 5 वर्षांच्या नीचांकी स्तरावर

Patil_p

गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य 2 किमी मागे हटले

datta jadhav

शोपियांमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

Patil_p