ऑनलाईन टीम / विशाखापट्टणम :
विशाखापट्टणमच्या आर. आर. वेंकटपुरम येथील विशाखा एल. जी. पॉलिमर कंपनीत आज पहाटे झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 8 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.


विषारी वायुगळतीमुळे कंपनी परिसरातील 1 हजारहून अधिक लोकांना उलटी, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आहे. काहींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषारी वायूमुळे एका लहान मुलासह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण गंभीर आहेत.
स्थानिक प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून कंपनी परिसरातील 5 गावे रिकामी केली असून, अधिक लोकांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात 1500 ते 2000 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
एल. जी. पॉलीमर्स ही कंपनी पॉलिस्टायरेन आणि त्याचे को-पॉलिमर्सची निर्मिती करते. कंपनीतील वायुगळतीचे कारण अद्याप समोर आले नाही.