Tarun Bharat

विशाखा समितीकडून झाली चौकशी

जिल्हा परिषदेकडून पोलिसांचा अहवाल आल्यानंतर शासनाकडे पाठवला जाणार

प्रतिनिधी/ सातारा

विशाखा समितीकडे झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी सातारा पंचायत समितीमध्ये चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये नेमका काय प्रकार घडला हे समजू शकले नाही. दरम्यान, विनयभंगाचा गुन्हामध्ये सातारा तुलका पोलिसांच्या ताब्यात असलेले गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ हे सोमवारीही रुग्णालयातच होते.  दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे सातारा तालुका पोलिसांकडून अद्याप अहवाल न गेल्याने तो अहवाल आल्याने शासनाकडे पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात आता राजकीय पक्षांनी अडी घेतली असून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ या मंगळवारी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेणार आहेत.

विशाखा समितीकडे आलेल्या तक्रारीनुसार आज चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये नेमके काय घडले हे मात्र समजू शकले नाही. परंतु समितीचा अहवाल गोपनिय पद्धतीने जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येईल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असे समजते. दरम्यान, सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात असलेला सातारा पंचायत समितीचा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ हा अजूनही छातीत दुखत असल्याने रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पोलिसांचा अहवाल आला नसल्याने  तो पुढे शासनाकडे पाठवण्यात आला नाही. तो अहवाल आल्यानंतर तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, असे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सांगितले.

राजकीय पुढाऱयांनी घातले लक्ष

या प्रकरणात राजकीय पक्षांनी लक्ष घातले असून भाजपाच्या महिला प्रदेशअध्यक्षा चित्राताई वाघ यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून त्या मंगळवारी खास त्या प्रकरणानिमित्ताने साताऱयात येणार आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची भेट घेवून माहिती घेणार आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये जोपर्यंत संजय धुमाळ यास बडतर्फ केले जात नाही तोपर्यंत हे प्रकरण चांगलेच चिघळणार आहे.

Related Stories

पाठलाग करुन दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

Patil_p

भिलवडीत कोरोनाबाधित सराफाच्या घरात १० लाखांची चोरी

Archana Banage

तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar

बंडातात्यासाठी आ.महेश शिंदे वारकरी वेशात रस्त्यावर

Patil_p

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन

Abhijeet Khandekar

‘हे’ सत्ताधाऱ्यांचे कौतुक की सातारकरांचे दुर्दैव?

datta jadhav