Tarun Bharat

विशाल कडणेच्या कामाची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् कडून दखल

Advertisements

कोरोना काळात केलेल्या कामाचा गौरव

प्रतिनिधी / कणकवली:

तळेरे गावचे सुपुत्र मुंबई-भांडुपमधील तरुण युवक विशाल कडणे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली 2 वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहे. स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेल्या पैशातून त्यांनी कोविड रुग्नग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप केले. गेल्या 2 वर्षात त्यांनी 100 पेक्षा अधिक कोविड रुग्णांना जीवनदान दिले आहे. त्यांच्या याच नि:स्वार्थी कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसकडून घेतली गेली आहे. 21 जून 2021 रोजी लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस युरोपचे प्रमुख विल्हेम जेझलर यांनी विशाल कडणे यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रमाणपत्र प्रदान करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे विशाल यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेलेला विशाल कडणे हा वयाने सर्वात तरुण असून लंडन येथील विम्ब्लये ब्रेंट महापालिकेचे महापौर भगवान चोहान यांनी स्वतः फोन करून विशालचे अभिनंदन केले. शिक्षणाने सिव्हिल इंजिनिअर असलेले विशाल कडणे हे गेले 1 वर्ष सातत्याने कोविड रुग्णांची सेवा करत आहेत. अनेक गरजू रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन कमतरता असताना त्यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून कौतुक केले होते.

समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन कोरोनाच्या महामारीचा सामना करायला हवा असे विशाल कडणे यांनी सांगितले. यथाशक्ती प्रत्येकाने कोविड रुग्णांची सेवा करायला हवी आणि सुरुवात स्वतः पासून करायला हवी या तत्वानेच मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सेवा सुरु असल्याचे सांगितले. आजपर्यंत खडतर परिस्थितीमधून मार्ग काढत असताना विशाल कडणे यांनी मुंबई, सिधुदुर्ग, सातारा, कराड, विटा इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने या मशीन पोहोचवल्या आहेत.

यावेळी विशाल यांचे सर्व कुटुंब सहभागी असून त्यांचे आई वडील सौ. जयश्री व विजय कडणे यांची प्रेरणा असल्याचे सांगितले. त्यांचे सहकारी डॉ. प्रमोद जाधव, वैभव भुर्के, गौरव पोतदार, चेतन वैद्य, पंकज चावरे व इतर सर्वांची मोलाची मदत होत असल्याचे विशाल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्सतर्फे दखल घेऊन सन्मान झाल्याने समाजाच्या सर्व स्तरातून विशाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

ऑनलाईन फसवणूक रॅकेट, रत्नागिरीत तिघे जेरबंद

Patil_p

जिल्हय़ात सातव्या दिवशीही एसटीची वाहतूक बंद

Patil_p

‘कंटेनमेंट झोन’मुळे अधिकाऱयांच्या सक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह

NIKHIL_N

कीटकभक्षी ‘युट्रीक्युलरिया’ने फुलली दापोलीतील पठारे!

Patil_p

दापोलीत पाच पोलीस कुटुंबाला डेंग्यूची लागण

Abhijeet Shinde

वालावल आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

NIKHIL_N
error: Content is protected !!