Tarun Bharat

विशेष डॉक्युमेंटरी उलगडणार रत्नागिरीच्या नमन-खेळ्याचे अस्सल रुप!

Advertisements

नाटय़निर्माता-दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांचा पुढाकार

विजय पाडावे/ रत्नागिरी

कोकणातील ‘दशावतार’ लोककलेला राजाश्रय मिळाला…पण रत्नागिरी जिल्हय़ातील नमन- खेळे ही पिढय़ानपिढय़ांची लोककला मात्र सांस्कृतिक स्पर्धेत सर्वात मागे राहिली. आता हीच लोककला जगभर पोचविण्याचे प्रयत्न होणार आहेत. नाटय़ निर्माता, दिग्ददर्शक, लेखक, अभिनेते पुरुषोत्तम बेर्डे यांनी या लोककलेला ‘डायिंग आर्ट’ असे संबोधून इंग्रजी व मराठी भाषेत ‘डॉक्युमेंटरी’ करण्याचा विडा उचलला आहे. त्याद्वारे मोठ-मोठय़ा शहरात शिबीरांच्या माध्यमातून ‘नमन’ लोककला सर्वांपर्यंत पोहचवली जाणार आहे.

   नमन ही प्रामुख्याने रत्नागिरी जिह्यामधील एक प्रसिध्द लोककला आहे. नमन झांजगी खेळे या नावानेही ओळखले जाते. ग्रामिण भागातील कष्टकरी, शेतकरी प्रेक्षकांना करमणुकीचे प्रमुख साधन म्हणजेच नमन. पारंपरिक नमनाला आता  म्युझीक, लाईट साउंड, नेपथ्य, वेशभुषेच्या माध्यमातून आधुनिक साज लाभलाय. पण त्या लोककलेचा पारंपरिक बाज आजही कायम आहे. शिमगोत्सवाच्या आधीपासून कोकणातल्या विविध खेडय़ात रात्री नमनांचे कार्यक्रम रंगू लागतात. कोकणात इतर लोककलांपेक्षा या लोककलेला मिळणारा रसिकांचा प्रतिसाद  अवर्णणीय असतो. पण ही कला काळानुरूप पिछाडीवर राहिली. त्यामुळे या लोककलेला राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी नाटय़ निर्माता दिग्ददर्शक, अभिनेते पुरूषोत्तम बेर्डे यांनी पुढाकार घेतला आहे.

  बेर्डे यांनी यादृष्टीने रत्नागिरी जिल्हा दौरा केला. त्यात त्यांनी इतर लोककलांसह dनमन लोककलेशी जोडलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. रत्नागिरी तालुक्यातील टिके कांबळेवाडी येथे ही लोककला जोपासणाऱया कार्यकर्त्यांशी भेट घेऊन त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. त्या चर्चेदरम्यान या लोककलेला जगासमोर नेण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांवर पुरूषोत्तम बेर्डे यांनी खास संवाद साधला. त्यांनी नमन या लोककलेची डॉक्युमेंटरी करण्यात येणार असल्याचे सांगितले. ही डॉक्युमेंटरी इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  कोकणात कुठेही नाटक व नमन हे कार्यक्रम ठेवा. पण प्रेक्षकांची गर्दी कुठे होते हे जर बघितले तर नमनाला उदंड प्रतिसाद लाभेल. ही लोककला येथील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे जाणवल्याचे बेर्डे यांनी सांगितले.     शासन दरबारी सांस्कृतिक लोककलेविषयी केला जाणारा दुजाभावही त्यांनी यावेळी कथन केला. सांस्कृतिकदृष्टय़ा लोककला मंत्रालय शेवटच्या नंबरवर आहे. ठेकेदाराला मंत्रालयात लवकर आत घेतले जाईल. पण नमन मंडळाचा अध्यक्ष असाल तर उद्या या अशी परिस्थिती असल्याचे बेर्डे म्हणाले.

  नमन जपणाऱया येथील मंडळांच्या कार्यकर्त्यांचे, गावकऱयांचे बेर्डे यांनी भरभरून केतुक केले. कोणतेही पाठबळ, गॉडफादर नसताना ही सारी मंडळी ही लोककला प्रेमाने, आत्मियतेने जोपासत आहेत. म्हणूनच राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर ही लोककला नेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले.

   नमन ही शुध्द पारंपरिक कला असूनही सांस्कृतिक स्पर्धेत सर्वात मागे राहिलेली कला आहे. आज ती तशी ठेवू शकत नाही. पण येथील कलावंतांना, जाणकारांना त्यांची माहिती आहे. काळाप्रमाणे लोकाभिमुख करून ओरिजनल दय़ायचे आहे. त्यासाठी बेर्डे यांनी ‘टुरटुर’ व 2016 मधील ‘जाऊ बाई जोरात’ या नाटकांच्या सादरीकरणाची उदाहरणे दिली. त्यामुळे नमनावर डाक्युमेंटरी करताना किती वेळ लागेल हे न सांगता त्यासाठी आतापासून पायाभूत तयारी करत असल्याचे सांगितले.

लोककला पुढे नेण्यासाठी राजकीय नेतृत्व कमकुवत

दशावताराचा नमनापेक्षा जास्त प्रसार झालेला आहे. वेगवेगळय़ा लोकांनी या लोककलेला हातभार लावला आहे. दुदैंवाने रत्नागिरी जिल्हय़ात राजकीय नेतृत्व स्ट्राँग आहे. पण ही लोककला पुढे नेण्यासाठी हे नेतृत्व कमकुवत असल्याची खंत बेर्डे व्यक्त केली. त्यामुळेच ही लोककला मागे आहे. राजकीय नेतृत्व इतके मोठे हवे की त्यांनी हात लावले की, लोककला मोठी झाली पाहिजे. जसे यशवंतराव चव्हाण होऊन गेले, आता शरद पवार, सिंधुदुर्गात नारायण राणे आहेत. त्यांनी तेथील लोककलेला मोठे केलेय. राजकीय नेतृत्वाने, सांस्कृतिक गोष्टींना हात लावणे म्हणजे ती मोठे होणे असे घडले पाहिज,s असे पुरुषोत्तम बेर्डे सांगतात.

कुणका-भाकर-कांदयासारखे ओरिजनल सादरीकरण करायचे आहे

आज युटय़ुब’ वर बऱयाच गोष्टी उपलब्ध आहेत. पण त्या तकलादू आहेत.  फास्टफूड पेक्षा झुणका-भाकर मिळाली तर ओरिजनल भाकरीकडे खवय्यांचा ओढा राहतो. त्यामुळे झुणका भाकर कांदा व केळीच्या पानासारखे सादरीकरण करायचे ओहे. तरच आपण इतर लोककलेची स्पर्धा करू शकणार आहोत.

Related Stories

भारतीय परंपरेतला ‘वानप्रस्थाश्रम’ अनुभवतोय…!

Patil_p

राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका विमल नाईक यांचे निधन

Ganeshprasad Gogate

दापोलीत पुन्हा 220 किलो गोमांस जप्त

Patil_p

सिंधुदुर्ग विभागाची वीजबिल थकबाकी साडेपाच कोटींवर

NIKHIL_N

कोल्हापूरातील दारू कारवाईत सावंतवाडीतील एकास अटक

Ganeshprasad Gogate

तब्बल 14 वर्षांनंतर प्रकल्पग्रस्ताचे घर प्रकाशमय

NIKHIL_N
error: Content is protected !!