Tarun Bharat

विशेष पथकाचा शहरातील चार ठिकाणी मटका व्यवसायावर छापा

Advertisements

सोलापूर/प्रतिनिधी

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरातील चार ठिकाणच्या मटका व्यवसायावर छापे टाकून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष पथकाने एसटी स्टँडसमोर वेलकम हॉटेलच्या बोळात, निराळे वस्ती रोडवरील पुनम हॉटेलच्याजवळ, किल्ला बगीचा येथील संगीतानंद पान शॉपच्या बाजूला तसेच लक्ष्मी मार्केट येथील संगमेश्वर टी हाऊसच्या बाजूला सुरु असलेल्या मटक्यावर छापा टाकला. यावेळी रफिक फतेअहमद नाईकवाडी, आदर्श अनमोल कदम, मल्लिनाथ बाळप्पा पांढरे, पांडुरंग अशोक मोरे, सायबण्णा मोनप्पा सुतार हे सार्वजनिक ठिकाणी देवकर व अरुण रोडगे (एआर) यांच्या सांगण्यावरून व दिलेल्या चिथावणीवरून लोकांकडून मटका घेत असताना आढळून आले. पाच एजंटांकडून जुगार साहित्य व रोख रक्कम असा 50 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

आरोपींवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी देवकर व रोडगे यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजिद पटेल, संजय साळुंखे व नरेंद्र नक्का यांच्या पथकाने केली.

Related Stories

सोलापूर जिल्ह्यातील १८७ रुग्णांना डिस्चार्ज

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 33 कोरोना पॉझिटिव्ह, एक मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : माढा सबजेलमधून पळालेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; दोघे अद्याप फरार

Abhijeet Shinde

करमाळ्यात कोट्यावधींची विकास कामे केली- माजी आ. नारायण पाटील

Abhijeet Shinde

पीक विम्याबाबत विमा कंपनी दोन दिवसात निर्णय घेणार : आ. राणाजगजितसिंह पाटील

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात १८९ रुग्ण कोरोनामुक्त तर ४३ पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!