Tarun Bharat

विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

सातारा : सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, सातारा येथे 13 कोटी 12 लाख खर्च करुन विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. 1 व्हीव्हीआयपी कक्ष, 2 व्हीआयपी कक्ष व 5 साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. तसेच मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहेत. हे विस्तारीत विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल. तसेच साताऱ्यात होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहिल यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसेच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावे.

यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.

सातारच्या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी 300 कोटी

सातारचे सैनिक स्कूल हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी प्रत्येक वर्षी 100 कोटी या प्रमाणे 300 कोटी देण्यात येणार आहे. येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

सातारा : कैलास स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे वाटप

Archana Banage

पेट्रोल परवडतय मग दूध का नाही?

Patil_p

आदित्यास्त्राने कट्टर शिवसैनिक चार्ज, समाजमाध्यमासह प्रत्यक्षात मिळणारा प्रतिसाद बंडखोरांचे खच्चिकरण करणारा

Rahul Gadkar

आता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार

Archana Banage

ओबीसी राजकीय आरक्षण रद्दला राज्य सरकार जबाबदार

datta jadhav

पदवीधर मतदारांना उमेदवारांनी आणले जेरीस, मेसेज,फोन कॉलचा पुरता भडिमार

Archana Banage