Tarun Bharat

विश्वकर्मा जयंती महोत्सव उत्साहात

बेळगाव : विश्वकर्मा जयंती महोत्सव मोठय़ा उत्साहात डॉ. एस. पी. एम. रोड येथील विश्वकर्मा मंदिरात साजरा करण्यात आला. संस्थेची स्थापना करून 75 वर्षे झाल्याबद्दल अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष भरत शिरोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विश्वकर्मांची पालखी काढण्यात आली. मूर्ती पूजनाची मांडणी उमेश पांचाळ यांनी केली. अमृत महोत्सवानिमित्त समाजातील डॉ. भूषण सुतार, लक्ष्मीबाई लोहार, गुरुनाथ सुतार, रुक्मिणीबाई लोहार यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी तिळगूळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत शिरोळकर, महादेव ठोकणेकर, किशोर कणबरकर, भीमराव सुतार, प्रकाश सुतार, चंद्रशेखर आंबेवाडीकर, दामोदर लोहार, प्रकाश लोहार, भरमा लोहार, वासुदेव काळे, परशराम अवरोळकर, किसन ठोकणेकर, बाळकृष्ण लोहार, भाऊराव देसूरकर, प्रदीप सुतार, प्रभाकर सुतार, विजय सुतार, रमेश सुतार, सोमनाथ काळे, विजय लोहार यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

बसस्थानकात पार्किंगअभावी प्रवाशांची गैरसोय

Patil_p

आता चंदनाच्या झाडांची चोरी

Patil_p

बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाचे कार्य कौतुकास्पद

Patil_p

मुलीच्या छेडछाडीनंतर चाकूहल्ल्यात चौघे जखमी

Amit Kulkarni

शहरातील रिक्षा-टमटमचे अडथळे दूर करा

Amit Kulkarni

समाज कल्याण कार्यालयाचे 22 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni