Tarun Bharat

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला 7 पदके

वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)

आयएसएसएफच्या येथे झालेल्या 2022 विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी करत पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविताना चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 7 पदकांची कमाई केली.

या स्पर्धेच्या सोमवारी शेवटच्या दिवशी भारताने दोन पदके मिळविली. भारताच्या  रिदम सांगवान आणि अनिष बनवाला यांनी पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना थायलंडचा 17-7 असा पराभव केला.

पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल सांघिक प्रकारामध्ये भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या क्रीडाप्रकारात जर्मनीने भारताचा 17-7 असा पराभव करत सुवर्णपदक घेतले. भारताच्या गुरूप्रित सिंग, अनिष बनवाला आणि भावेश शेखावत यांना रौप्यपदक मिळाले.

या स्पर्धेत रविवारी झालेल्या महिलांच्या 25 मी. पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारात भारताने सिंगापूरचा 17-13 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात राही सरनोबत, इशा सिंग आणि रिदम सांगवान यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेत भारताच्या इशा सिंगने एकूण तीन पदके मिळविली असून तिने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल वैयक्तिक नेमबाजीत रौप्यपदक मिळविले. तिने या स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

सदर स्पर्धेमध्ये भारताच्या सौरभ चौधरीने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. स्पर्धेच्या पदक तक्त्यात नॉर्वे संघ दुसऱया स्थानावर असून त्यांनी तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कास्यपदके जिंकली आहेत. फ्रान्सने तीन सुवर्ण पदकांसह तिसरे स्थान घेतले आहे.

Related Stories

भारताचा शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचे नेतृत्व कमिन्सकडे

Amit Kulkarni

एअर इंडियाच्या कर्मचाऱयाविरूद्ध कारवाईची मनू भाकरची मागणी

Patil_p

भारतीय हॉकी संघाचा जर्मनीला पुन्हा धक्का

Patil_p

दोन ‘रॉयल्स’ संघ आज पुन्हा आमनेसामने

Patil_p

दिल्लीचा मुंबईवर 8 गडय़ांनी विजय

Patil_p