Tarun Bharat

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा रद्द

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येत्या जानेवारीत न्यूझीलंडमध्ये आयोजित केलेली विश्व बॅडमिंटन फेरडेरशनच्या कनिष्ठांच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धा कोरोना समस्येमुळे रद्द करण्यात आल्याची घोषणा गुरूवारी फेडरेशनतर्फे करण्यात आली. कोरोना समस्येमुळे या स्पर्धेवर नियमावलीचे बंधन ठेवण्यात येत असल्याने सदर स्पर्धा साशंकतेच्या वलयात सापडली होती.

सदर स्पर्धा यावर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान घेण्याचे निश्चित केले होते पण कोरोनामुळे ही स्पर्धा जानेवारी महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना समस्येचे सावट या स्पर्धेवर असल्याने इच्छुक बॅडमिंटनपटूंच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सर्व समस्येमुळे सदर स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर केला. कोरोना संदर्भातील नियमांच्या अटीनुसार सदर स्पर्धा घेणे अशक्य असल्याचे न्यूझीलंडच्या बॅडमिंटन फेडरेशनने म्हटले आहे. 2021 च्या विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे यजमान यापूर्वीच निश्चित झाले असल्याचे विश्व बॅडमिंटन फेडरेशनचे सचिव थॉमस लुंड यांनी सांगितले. कोरोना समस्येमुळे विविध बॅडमिंटन स्पर्धांच्या वेळापत्रकावर अनिश्चितचे सावट निर्माण झाले आहे. 2024 सालातील विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची न्यूझीलंड बॅडमिंटन संघटनेने इच्छा व्यक्त केली आहे. 2021, 2022 आणि 2023 सालातील होणाऱया या स्पर्धेचे यजमान यापूर्वीच निश्चित झाले आहे. विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा 2021 च्या ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये भरविली जाणार आहे.

Related Stories

ग्यानेंदो निन्गोम्बम हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

Patil_p

अर्थाचा अनर्थ….

Patil_p

मेकॉलम इंग्लंड कसोटी संघाचा प्रमुख प्रशिक्षक

Patil_p

पीव्ही सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

Patil_p

भारताची आज पोलंडविरुद्ध साखळी लढत

Patil_p

दुसऱया ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत रिझवी, रजपूतचे यश

Patil_p