Tarun Bharat

विश्व हिंदू महासभा प्रदेशाध्यक्षांची हत्या

गोळय़ा झाडल्याने जागीच मृत्यू : उत्तर प्रदेशातील घटना

लखनौ / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे रविवारी विश्व हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष रणजित बच्चन यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी सहा विशेष तपास पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. या हत्येच्या घटनेमुळे राज्यात जनक्षोभ उसळल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलिसांनी रणजित बच्चन यांचे पार्थिव ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

रणजित बच्चन रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लखनौमधील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. मित्रासमवेत ग्लोब पार्कमध्ये ते फिरण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. डोक्याला गोळी लागल्याने रणजित बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासमवेत असलेल्या अन्य दोघांना गोळय़ा लागल्या असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले. उत्तर प्रदेश पोलीस आणि गुन्हे शाखा यांची सहा पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुजित पांडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. 

रणजित बच्चन यांच्या हत्येच्या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रणजित बच्चन यांच्या हत्येपूर्वी अलीकडेच हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या झाली होती.

Related Stories

उपलब्ध ऑक्सिजन अत्याधिक आवश्यक वस्तू म्हणून वापरा

Patil_p

75 टक्के बाधितांमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंट

Amit Kulkarni

पद्मभूषण जमशेद इराणी यांचे निधन

Patil_p

झोमॅटोला आणखी एक मोठा झटका

Patil_p

पंजाबमध्ये कोरोनाचे 150 नवे रुग्ण, एकूण संख्या 5568 वर 

Tousif Mujawar

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Patil_p