Tarun Bharat

विसर्जनादिवशी महाद्वार रोडवर `नो इंट्री’

प्रत्येक मंडळासोबत एक पोलिस

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जना दिवशी महाद्वार रोड गणपती विसर्जनासह सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. दरम्यान गुरुवारी जिह्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यांच्या बैठका घेवून विसर्जनासाठीच्या सुचना देण्यात आल्या.

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे गणेश विसर्जन रविवारी (दि. 19) रोजी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विसर्जन मिरवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. गुरुवारी दिवसभर पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जिह्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यांच्या बैठक घेतल्या. राज्य शासनाच्या निर्णयाचे पालन करणे, विसर्जन मिरवणूकीस परवानगी नाही, याबाबत अधिकार्‍यांनी भागातील मंडळांना सुचना करण्याचे आदेश त्यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी अनंत चतुर्थी दिवशी बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा मुख्य महाद्वार रोड वाहतूकीस बंद करण्यात आला होता. या वर्षीही राज्य शासनाने विसर्जन मिरवणूकीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून महाद्वार रोड वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी रात्री बॅरेकेडस् लावून हा मार्ग बंद करून तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना गतवर्षीप्रमाणे यंदाही पर्यायी मार्गाने इराणी खणीकडे जावे लागणार आहे.

विसर्जनादिवशी होणारी गर्दी लक्षात घेवून पोलिस प्रशासनाने नियोजन सुरु केले आहे. विसर्जनसाठी महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेवून निर्भया पथके संभाव्य गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. तर चोर्‍या रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनाही विसर्जन मिवरणूकीत सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

विसर्जनावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा आधार

विसर्जना दिवशी मिवरणूकीवर बंदी असल्याने निर्बंधाचा उल्लंघन करणार्‍या मंडळांवर सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी कंट्रोल रुममध्ये एक पथक तैनात करण्यात आले आहे. आवश्यक त्या नुसार बंदोबस्ताच्या नियोजनात बदलही करण्यात येणार आहेत.

प्रत्येक मंडळासोबत एक पोलिस

विसर्जनादिवशी प्रत्येक मंडळांना विसर्जनासाठीची एक वेळ देण्यात आली आहे. बड्या मंडळांसोबत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

शहरासह जिह्यातील सर्व मंडळांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार गणेश आगमनादिवशी पोलिस प्रशासनास सहकार्य केले आहे. यंदा विसर्जन मिवरणूकीस बंदी असल्याने मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

– शैलेश बलकवडे, पोलीस अधिक्षक

Related Stories

सोन्यांच बाशिंग अन लगीन देवाचं लागलं…

Archana Banage

दोन आठवडय़ांत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक : खासदार धैर्यशील माने

Archana Banage

कागणीतील शेतकर्‍याचा बांधावरून पडून मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : कानूर बुद्रुक येथे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड

Archana Banage

कुंभोज: वारणा नदीवरील पुलावर लावलेले पत्रे हटवून वाहतूक सुरू

Archana Banage

आरक्षण सोडतीनंतर कही खुशी, कही गम’

Abhijeet Khandekar