Tarun Bharat

विहापूर येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत दोघांचा खून

प्रतिनिधी / कडेगाव

विहापुर ता.कडेगाव येथे झालेल्या किरकोळ मारहाणीच्या कारणावरुन झालेल्या मारामारीत संदीप भानुदास चव्हाण (वय-34) व विजय नानासाहेब माने (वय-35,दोघे रा. विहापुर) या दोघांचा खून झाला आहे. तर गणेश सतीश कोळी (वय-26) व गोरख महादेव कावरे (वय-30,दोघे रा.विहापूर) हे जखमी झाले आहेत. या खून प्रकरणी मधुकर उत्तम मोरे (वय-28) व विशाल तानाजी चव्हाण (वय-29,दोघे रा.विहापुर) यांच्याविरोधात कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित आरोपी मधुकर मोरे याला अटक केले. तर विशाल चव्हाण हा फरार आहे. ही घटना काल शुक्रवारी (ता.29) रात्री उशीरा घडली असून या दुहेरी खून प्रकरणाने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विहापूर येथील गणेश सतीश कोळी,गोरख महादेव कावरे व विजय नानासाहेब माने यांनी काल शुक्रवारी (ता.29) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरुन या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. तर गणेश,विजय व गोरख या तिघांनी मिळून आपल्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती मधुकर मोरे याला मिळाली.

त्यामुळे संतापलेल्या मधुकर याने आपला मित्र विशाल चव्हाण याला सोबत घेवून विजय माने, गणेश कोळी,गोरख कावरे यांना लाकडी दांडके, काठी व ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तर विजय,गणेश व गोरख या तिघांचा मित्र असलेला संदीप चव्हाण याला त्याच्या घरातून बाहेर बोलवून घेतले व संशयित मधुकर मोरे व विशाल चव्हाण या दोघांनी त्याला लाकडी दांडके, काठी व ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय माने हेही गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या खून प्रकरणाची माहिती मिळताच कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांचेसह पोलीस पथकाने विहापुर येथे घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.तसेच या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे यांच्या मुसक्या आवळल्या.तर दुसरा संशयित आरोपी विशाल तानाजी चव्हाण यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना केली.या खून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे हे करीत आहेत.

Related Stories

कॉपी करू न दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर दगडफेक; शिक्षक जखमी

datta jadhav

मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या २ टीम होणार सांगलीत तैनात

Archana Banage

सांगली जिल्ह्यात नवे ११५० रूग्ण, ३३ मृत्यू

Archana Banage

वारणा धरणात १८.०६ टीएमसी पाणीसाठा

Archana Banage

सांगली : फिडे मास्टर शाहीन सादेह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Archana Banage

सांगली : सोन्याळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरविना पोरका!

Archana Banage