Tarun Bharat

वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे.

या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. उच्चदाब वीजग्राहकांना मंडल कार्यालय, 20 किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना विभागीय कार्यालय आणि 20 किलोवॅटपर्यंत वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येईल. चालू वीजबिलाच्या रकमेचे हप्ते देण्याबाबत वीजग्राहकांच्या अर्जांवर 7 दिवसांत तर वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांच्या अर्जांवर 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. यासोबतच महावितरणच्या वेबसाईटवर या योजनेचे लवकरच स्वतंत्र पोर्टल सुरु होत असून त्याद्वारेही वीजग्राहकांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करते वेळी एकूण थकबाकीची दोन टक्के रक्कम संबंधीत ग्राहकांना भरावी लागेल. तसेच दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरद्वारे योजनेमधील विनाअट सहभागाचे प्रतिज्ञपत्र सादर करावे लागेल. अर्ज मंजुरीनंतर सात दिवसांमध्ये 30 टक्के डाऊन पेमेंट करणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी झाल्यानंतर चालू वीजबिलांसह दिलेल्या हप्त्यांप्रमाणे थकबाकीची रक्कम नियमित स्वरुपात भरणे आवश्यक आहे. या योजनेत 2020-21 या आर्थिक वर्षामध्येच सहभागी होण्याची मुदत असल्याने थकबाकीदार वीजग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा व योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Stories

अशोक गोडसे यांना श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Tousif Mujawar

कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या प्रशासनाधिकार्‍यावर गुन्हा दाखल

Archana Banage

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के

Tousif Mujawar

मराठा आरक्षण : …तर मराठा मोर्चाची लाट भयानक असेल

Archana Banage

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

Archana Banage

बार्शी तालुक्यातील शेलगाव(मा) हद्दीतील ओढ्यावरील बंधारा गेला वाहून

Archana Banage
error: Content is protected !!