Tarun Bharat

वीजबिल न भरल्याने हेस्कॉमने स्मार्ट सीटीचे कनेक्शन तोडले

अंदाजे साडेतीन लाख रुपये बिलाची थकबाकी : गलथान कारभाराचा नागरिकांना फटका

प्रतिनिधी / बेळगाव

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात अनेक नवे बसथांबे व प्रकल्प उभारण्यात आले आहेत. परंतु त्यांचे वीजबिल भरण्यात आले नसल्याने हेस्कॉमने त्यांचे कनेक्शन बंद केले आहे. यामुळे शहरातील अनेक बसथांबे अंधारात आहेत. कनेक्शन बंद करून दीड महिना उलटला तरी अद्यापही बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसू लागला आहे.

वारंवार नोटिसा तसेच इ-मेल पाठवूनदेखील स्मार्ट सिटीकडून त्याची दखल घेण्यात आलेली नसल्याने अखेर त्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. हेस्कॉमचे शहर उपविभाग 1 कडून दीड महिन्यापूर्वी स्मार्ट सिटीचे कनेक्शन तोडण्यात आले. उपविभाग 2 व 3 कडून दोन दिवसांपूर्वी कनेक्शन तोडण्यात आले आहे. यामुळे शहरातील बसथांबे अंधारात सापडले आहेत.

स्मार्ट सिटीचे वीज कनेक्शन तोडल्याने अधिकारीवर्गावर नामुष्की ओढवली आहे. मोठा गाजावाजा करत शहरात स्मार्ट सिटीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होण्याआधीच वेळच्या वेळी विजेचे बिल न भरल्याने कनेक्शन तोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कनेक्शन तोडल्यामुळे आता बिल भरण्यासाठी स्मार्ट सिटी अधिकाऱयांची धावपळ सुरू झाली आहे.

दीड महिन्यापूर्वी वीजपुरवठा बंद

स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या बसथांब्यांसोबत इतर प्रकल्पांना हेस्कॉमकडून वीजपुरवठा केला जातो. परंतु मागील काही महिन्यांपासून स्मार्ट सिटीकडून विजेचे बिल भरण्यात आलेले नाही. अनेक वेळा नोटिसा पाठवूनदेखील बिल भरण्यात न आल्याने अखेर दीड महिन्यापूर्वी वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांनी दिली.

शहरातील स्मार्ट सिटीची थकबाकी

  • शहर उपविभाग (मध्य भाग)1 – 96,153 रु.
  • शहर उपविभाग (दक्षिण भाग)2- 1,92,000 रु.
  • शहर उपविभाग (उत्तर भाग) 3 – 40 हजार रु.

Related Stories

येळ्ळूर गावासाठी दररोज 500 जणांना लस पुरवठा करा

Omkar B

पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजतेय

Omkar B

मच्छे येथे रस्ता रोको

mithun mane

उमेदवारांवर टीकात्मक वृत्त प्रसिद्ध केल्यास कारवाई

Amit Kulkarni

बेळगाव रेल्वे स्थानकाला वीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव द्या

Amit Kulkarni

शिरहट्टी येथे एका रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी

Patil_p