Tarun Bharat

वीजेवर चालणारी तीनचाकी सादर

Advertisements

.महिंद्राची ई-अल्फा कार्गो या मॉडेलचा समावेश : प्रति तास 25 किलोमीटर धावणार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून वीजेवर चालणाऱया तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) ई-अल्फा कार्गो या मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये याची किमत 1.44 लाख रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी साधारण वाहन पुनर्निमिती कंपनी महिंद्रा ऍण्ड महिंद्राची सहकारी कंपनी आहे. ई-अल्फा कार्गोच्या सादरीकरणासोबत कंपनीने बाजारात वेगाने वाढत जाणाऱया ई कार्ट श्रेणीत पाय ठेवले असल्याचे दिसून येत आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार तीनचाकी वाहन साधारणपणे 30 किलोपर्यंत वजन वाहणार असल्याचे म्हटले असून एका चार्जवर जवळपास 80 किलोमीटरपर्यंत सदरचे वाहन धावणार आहे. यामध्ये 1.5 किलोवॅट क्षमतेची बॅटरी उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त प्रति तास 25 किलोमीटर हे वाहन धावणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

ई बाईककडे वाढता कल

अलीकडच्या काळात डिलिवरी श्रेणीमध्ये वीजेवर चालणाऱया तीन चाकी वाहनांमध्ये तेजी प्राप्त होत असून इंधनावरील चालणाऱया तीनचाकी वाहनांच्या तुलनेत या वाहनांना पसंती दर्शवली जात असल्याचे महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा यांनी स्पष्ट केले.

Related Stories

‘मारुती’कडे सीएनजीची 7 मॉडेल्स उपलब्ध

Patil_p

मारुती आल्टोची दुसरी दशकपूर्ती उत्साहात

Patil_p

नवी ‘ऑडी’ची ए8 एल दाखल

Patil_p

नवी सेलेरियो लवकरच बाजारात ?

Patil_p

टीव्हीएसची नवी अपाचे दाखल

Omkar B

सुझुकीची मोटरसायकल विक्री तेजीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!