Tarun Bharat

वीज कनेक्शन बंद केल्याने महे येथील शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कसबा बीड / प्रतिनिधी

कोरोना महामारीत संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांना शेतीमालास योग्य हमीभाव नाही. त्यातून शेतकरी वर्ग सावरत आहेत, तोपर्यंतच शेतकऱ्यांच्या मुळावर विज बिल या संकटाने थैमान मांडले आहे. ऐन उन्हाळ्यात पिकासाठी पाण्याची आवश्यकता असते, पण महावितरण कंपनीच्या वीज बिल वसुली हातोड्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा चुराडा होत आहे. मार्च महिना आला की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या संकटात आणखीनच भर पडत असते. वर्षाअखेर असल्याने बँका, पतसंस्था, खाजगी सावकार, मुलांची शैक्षणिक फी, सोसायटी या सर्वांची वसुली होत असते.यावर्षी अवकाळी पावसामुळे व ऊस पीक वेळीच तोड न झालेने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा वेळी शेतकरयांना साथ न देता आणखीन अड्चणीत आणले जात आहे. त्यामुळे वीज कनेक्शन बंद केल्याने महे येथील शेतकरी निवास पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

यामुळे ग्रामीण भागात महावितरण कंपनी विरुद्ध रोष निर्माण होत आहे. कोणतीही नोटीस न देता कनेक्शन बंद करणे चुकीचे आहे. या वर्षी आलेली बीले वाढीव स्वरूपात आली आहे. ती कमी केलेली नाहीत. तसेच सभासद व पाणी पुरवठा चेअरमन यांना न सांगताच , व लेखी नोटीस न देता कनेक्शन बंद करणे चुकीचे आहे. महावितरणच्या मनमानी कारभार आम्ही खपवून घेणार नाही.

श्री निवास पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत महे ता. करवीर उपमुख्यमंत्री यांनी वीज कनेक्शन बंद करू नये असे सांगितले असताना महे गावातील पाणीपुरवठा व शेतकरी यांचे वीज कनेक्शन बंद करणे निंदनीय आहे. शेतकरी वीज बिल भरण्यासाठी तयार पण वेळ देणे गरजेचे आहे.- मुकूंद पाटील शेतकरी नेते कसबा ब

Related Stories

सात महिन्यांनी धावली हरिप्रिया..!

Archana Banage

धनंजय महाडिक यांनी घेतली राजू शेट्टी यांची भेट

Archana Banage

घंटागाड्यांच्या डिझेलसाठी लाखोंची उधळपट्टी

Abhijeet Khandekar

उचगाव ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा घेण्यासाठी जनआक्रोश निषेध मोर्चा; महिलांची संख्या लक्षणीय

Abhijeet Khandekar

मराठा आरक्षण : कोल्हापुरात चक्का जाम live

Archana Banage

त्यांनी रेल्वे स्टेशनवर अनुभवली माणुसकी

Archana Banage