Tarun Bharat

वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे उर्जामंत्र्यांचे निर्देश

ऑनलाईन टीम / मुंबई :

वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या त्वरित सोडविण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापनास दिले.


महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) यांच्यासोबत  कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर डॉ. राऊत यांच्या उपस्थितीत वीज कंपन्यांच्या फोर्ट मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 


व्याधी अथवा अपघात यामुळे शारीरिक दृष्ट्या निकामी झालेल्याना स्वेच्छा निवृत्ती, रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा ग्राह्य धरणे, वीज बिल वसुलीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेणे, अभियांत्रिकी पदवी व पदविका धारक तांत्रिक कर्मचाऱ्यांना कनिष्ठ व सहायक अभियंता या पदावर प्रतिनियुक्ती मिळण्याबाबत, पेन्शन योजना लागू करण्याबाबत, रिक्त पदे भरण्याबाबत व इतर मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. डॉ राऊत यांनी इंटकद्वारे उपस्थित केलेले प्रश्न तपासून निर्णय घेण्याचे निर्देश व्यवस्थापनाला दिले.

  • गृहमंत्र्यांसोबत बैठक घेणार


स्थानिक दबावात वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे असोत किंवा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्याना योग्य ती शिक्षा होण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी यावेळेस सांगितले.उच्च अर्हता धारण करणाऱ्यांना वरिष्ठ पदावर प्रतिनियुक्तीसाठी 15 वर्षाची अट शिथिल करण्याची मागणीही त्यांनी मान्य केली.

Related Stories

सर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का?; मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्ला

Archana Banage

१६ कोटीच्या इंजेक्शननंतरही पुण्यातील चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू

Archana Banage

चिंताजनक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,576 नवे कोरोना रुग्ण; 280 मृत्यू

Tousif Mujawar

कोल्हापूर व मुंबई विभागातील उच्च माध्यमिक शाळांना न्याय देऊ – नाना पटोले

Archana Banage

अभिनेते ऋषी कपूर रुग्णालयात दाखल ?

datta jadhav

महाराष्ट्राने वेगळा कृषी कायदा करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – राजू शेट्टी

Archana Banage