Tarun Bharat

वीज तक्रारींच्या संख्येत घट

Advertisements

बैठकीला मोजकेच तक्रारदार उपस्थित

प्रतिनिधी/ बेळगाव

वाढीव वीज बिल तसेच इतर विजेसंबंधीच्या तक्रारी हेस्कॉम कर्मचाऱयांकडून वेळच्या वेळी सोडविण्यात येत असल्यामुळे तक्रार निवारण बैठकीतील तक्रारी कमी झाल्या आहेत. शनिवारी आयोजित तक्रार निवारण बैठकीत काही मोजकेच तक्रारदार सहभागी झाले होते. त्यांच्याही समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

ग्राहकांच्या समस्या वरि÷ अधिकाऱयांपर्यंत पोहचवून त्या त्वरित सोडविल्या जाव्यात यासाठी कर्नाटक ऊर्जा विभागाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱया शनिवारी तक्रार निवारण बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक महिन्याला या बैठका होतात. लॉकडाऊननंतर क्वचितच बैठक होत्या. वीज बिलातील तफावत, मीटर रिडींग, नावातील बदल यासह इतर तक्रारी या बैठकीत मांडता येतात.

नेहरूनगर येथील हेस्कॉम शहर कार्यालय 3 मध्ये बैठकीला काही तक्रारदार वाढीव वीजबिलाच्या तक्रारी घेऊन आले होते. त्यांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हमण्णावर, मल्लाप्पा बुगडीकट्टी, पवनकुमार, बी. आर. सरस्वती, मल्लाप्पा नेजकर, डी. क्ही. हंदिगनूर यासह हेस्कॉमचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

चोरटय़ांनी केले मंदिरांना लक्ष्य

Rohan_P

ओंकार नगरमधील नाला बांधकामास प्रारंभ

Amit Kulkarni

वळिवाने शहर परिसराला झोडपले

Patil_p

रेल्वेस्थानकाचे 80 टक्के विकासकाम पूर्ण

Amit Kulkarni

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Amit Kulkarni

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱयांचे आंदोलन

Omkar B
error: Content is protected !!