Tarun Bharat

वीज तोडणी विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा : राजू शेट्टी

Advertisements

सांगली प्रतिनिधी

सक्तीची वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसाची वीज द्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने  शुक्रवारी १८ फेब्रुवारी  रोजी दुपारी ११ वाजता सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या मोर्चात इतर प्रमुख मागण्या करण्यात येणार आहे त्यामध्ये उर्वरीत एफ.आर.पी. तातडीने द्यावी. वजनातील काटामारी थांबवावी, तोडीसाठी घेतले जाणारी पैश्याची पध्दत बंद करावी. द्राक्षपिक विमा योजना सक्षम करावी. पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी द्राक्षबागाना आवरण कागदासाठी अनुदान द्यावे. रासायनिक खते, कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ तात्काळ मागे घ्यावी.  सक्तीची वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसाची वीज द्यावी. भूमी अधिग्रहण कायदा पुर्वीप्रमाणे लागू करावा. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान सत्वर द्यावे या मागण्या करण्यात येणार आहे.

या मोर्चात प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी पक्ष प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, महेश खराडे, पोपट मोरे, यांची  असणार आहे.

Related Stories

एच-1बी व्हिसा स्थगित करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार

datta jadhav

सांगली : कुपवाडकरांसाठी स्वतंत्र कोविड लसीकरण केंद्र सुरु करा: संघर्ष समितीची मागणी

Abhijeet Shinde

‘फायझर-बायोएनटेक’ला WHO चे ग्लोबल ॲप्रूव्हल

datta jadhav

लॉकडाऊननंतर उद्योजकांसमोर आता नवीन संकट

datta jadhav

शिवबंधन नको!महाविकास आघाडीतून संधी द्या: संभाजीराजेही भूमिकेवर ठाम

Rahul Gadkar

मेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणही कमी होणार; मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!