Tarun Bharat

वीज पडून दोघांचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी/ खंडाळा

खंडाळा तालुक्यातील कवठे येथील वेताळमाळ परिसरात दुपारी वीज पडुन दोन्ही शेतकयांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.झगलवाडीचे शेतकरी

शशिकांत दादासाहेब लिमण (वय 42), कवठे गावचे शेतकरी खाशाबा भाऊसो जाधव(वय 60 वर्षं) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.

   याबाबात मिळालेली माहिती अशी कि,झगलवाडी येथुन शशिकांत लिमण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेताळमाळ शेतात खाशाबा जाधव यांच्या शेतात उन्हाळी भुईमुग भिजविण्यासाठी आज कवठे येथे गेले होते,यावेळी खाशाबा जाधव हे सुध्दा शेतात काम करत होते.

दुपारी विजेचा कडकडाट सुरु असताना, शेतात काम संपल्यावर बांधावर झाडाखाली हे दोघे जण जेवण करत असताना,या दोघांच्या ही अंगावर अचानक वीज पडली व दोन्हीही शेतकरी जागेवरच मयत झाले. दरम्यान घटनेचे वृत्त पोलीसांना समजताच,शिरवळ पोलीस ठाण्याचे सागर अरगडे,पांडुरंग हजारे व विनोद पवार यांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला.

Related Stories

निगडीची महिला कोरोनामुक्त

Archana Banage

राज्यात सध्या लॉकडाउन नाही : मुख्यमंत्री

Archana Banage

पाणी पुरवठा सभापती सीता हादगे ऑन फिल्ड

Patil_p

सोलापुरात बुधवारी नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

सदरबाजारमध्ये दिवसभर तणाव

Patil_p

पुण्यात कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती, बाळ कोरोनामुक्त

prashant_c
error: Content is protected !!