Tarun Bharat

वीज बिल वसुलीची सक्ती न करण्यासाठी कर्मचाऱ्यांचेच आंदोलन

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारी व कंत्राटी कामगारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावा, कोरोनामुळे वीज बिल वसुलीची सक्ती कर्मचाऱयांवर करू नये, तसेच मेडिक्लेम योजनेत परस्पर नेमलेला टीपीए बदलावा या मागणीसाठी वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी (24) काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱयांची नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. आंदोलन काळात हॉस्पिटल व इतर अत्यावश्यक ठिकाणीच सेवा दिली जाणार. इतर कोणतीही कामे करण्यात येणार नाहीत, असे संयुक्त कृती समितीने कळविले आहे.

कोरोना काळात ग्राहकांना सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगारांना प्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा ही मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. प्राधान्य देऊन लसीकरण न केल्यामुळे शेकडो वीज कामगारांचा जीव गेला आहे. हजारो कामगार व कुटुंबीय कोरोना बाधित झाले आहेत. वीज कर्मचारी, अधिकाऱयांबाबत ऊर्जा विभाग व महाराष्ट्र शासनाचे नकारात्मक धोरण दिसून येत आहे. असे असतानाही कोरोना महामारीत वीज कामगार, अधिकारी जोखीम पत्करून कार्यरत आहेत. तिन्ही कंपन्यांतील कामगार व कंपन्या यांच्या सहभागातून 2015 पासून सुरू केलेल्या राज्य विद्युgत मंडळ सुत्रधारी कंपनी मेडिक्लेम पॉलिसीमध्ये 2020 पासून परस्पर ऊर्जा विभागाकडून टीपीए नेमला आहे. या महामारीच्या काळात मेडिअसिस्ट नवीन टीपीएची नेमणूक केल्यामुळे असंतोष निर्माण झाल्याचे संयुक्त कृती समितीचे म्हणणे आहे.

सरकारकडे या आहेत मागण्या-

– प्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा मिळाव्यात.

– वीज कर्मचारी, अधिकाऱयांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे.

– कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांना 50 लाखांचे अनुदान द्यावे.

– तिन्ही कंपन्याकरिता एम.डी. इंडिया या जुन्याच टीपीएची तत्काळ नेमणूक करावी.

– महाराष्ट्रात कोरोनाचा उदेक पाहता वीज बिल वसुलीकरिता सक्ती करू नये.

जनतेला वेठीस धरणार नाही

कर्मचारी, अधिकाऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून वीजनिर्मिती, वहन, वितरण आणि वीज बिल वसुली मोहीम राबविण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू आहे. कोकणात झालेल्या चक्रीवादळात वीज यंत्रणा विस्कळीत झाल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज कामगार व अभियंते अविरत राबत आहेत. सोमवारी आमची सर्व प्रकारची कार्यालयीन कामे बंद असतील. अत्यावश्यक सेवा चालू राहील. जनतेला वेठीस धरणार नाही. आमच्या मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी शासनाने सोमवारची वेळ दिली आहे. – विजयकुमार राकले, झोनल सचिव, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ.

Related Stories

सोलापूर शहरात 47 कोरोना पॉझिटीव्ह तर 4 जणांचा मृत्यू

Archana Banage

माढा तालुक्यातील कुर्डूत बालविवाह रोखला

Archana Banage

अक्कलकोटच्या रिक्षाचालकांने वाचवले जखमी दुर्मिळ खोकडचे प्राण

Archana Banage

पर्यावरणाचा सर्वच क्षेत्रांशी संबंध – रजनीश जोशी

Archana Banage

सोलापूर : पिकांच्या काढणीसाठी शाळकरी मुलांची पालकांना मदत

Archana Banage

सोलापूर : कुर्डुवाडीतील मिलला आग; लाखो रूपयांचे नुकसान

Archana Banage