Tarun Bharat

वीरजवान संदीप सावंत अनंतात विलीन

Advertisements

कराड/प्रतिनिधी

जम्मूकाश्मिर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या शहीद संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंधू सागर सावंत यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी हजारो कराडवासीय उपस्थित होते.

शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव आज सकाळी कराड येथे आणण्यात आले. कराडच्या विजय दिवस चौकातून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. युवकयुवतींसह लाखोंचा जनसमुदाय अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. संदीपदादा अमर रहेवीरजवान तुझे सलामच्या घोषणांनी कराड ते मुंढे रोडवरील प्रत्येक रस्ता दणाणून गेला होता. मुंढे गावातील रस्त्यावर शहीद संदीप सावंत यांचे फलक लावण्यात आले होते तर रस्ता रांगोळी आणि फुलांनी सजवला होता. रस्त्याच्या दुतर्फा महिला, मुली, शालेय विद्यार्थी हातात फुले घेऊन अंत्यदर्शनासाठी थांबले होते.

शहीद संदीप यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कुटूंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. त्यानंतर पार्थिक मुंढे येथे सावंत यांच्या शेतात नेण्यात आले. तिथे शासकीय इतमामात संदीप यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

कराड, फलटण, वाईचा बिगुल

Patil_p

ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

datta jadhav

सातारा पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन

Abhijeet Shinde

गुरुवर्य पतसंस्थेत 43 लाखांचा अपहार

Patil_p

पोलीस कर्मचाऱयांना मारहाण; दोघांना अटक

Omkar B

अन पालिकेने स्वच्छ केली ती कचराकुंडी

Omkar B
error: Content is protected !!