Tarun Bharat

वीरशैव-लिंगायत विकास निगमसाठी 500 कोटी

राज्य सरकारकडून अनुदान : अलिकडेच झाली होती निगमची घोषणा

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात मराठा विकास निगम स्थापनेची घोषणा झाल्यानंतर वीरशैव-लिंगायत समाजाकडूनही दबाव आल्याने राज्य सरकारने वीरशैव-लिंगायत विकास निगम स्थापनेची घोषणा केली होती. आता या निगमसाठी 500 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानातून वीरशैव-लिंगायत समाजाच्या आर्थिक, शैक्षणि क आणि सामाजिक विकासासाठी अनेक योजना राबविल्या जाणार आहेत.

कंपनी कायदा-2013 च्या सेक्शन 7 नुसार कर्नाटक वीरशैव-लिंगायत विकास निगमची स्थापना करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच या निगमसाठी व्यवस्थापकीय संचालकांचे पद निर्माण करण्याची सूचना मागासवर्ग कल्याण खात्याच्या आयुक्तांना देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री बी. सी. पाटील यांच्यासह अनेक मंत्री-आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यावर दबाव आणला होता. त्यामुळे मागील आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी या समाजासाठी निगम स्थापनेची घोषणा केली होती.

सरकारच्या या निर्णयाला लिंगायत समाजातील काही नेते आणि स्वामीजींनीही विरोध व्यक्त केला आहे. तीव्र विरोध असताना देखील मुख्यमंत्र्यांनी निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले होते. आता सुरुवातीच्या टप्प्यात या निगमसाठी 500 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

Related Stories

चार खात्यांसाठी सिंगल विंडो जारी करणार

Amit Kulkarni

बेंगळूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ

Archana Banage

मुख्यमंत्र्यांविरोधात भाष्य करणार्‍यांची हकालपट्टी करण्यासाठी भाजप आमदार पक्षश्रेष्ठींना भेटणार

Archana Banage

खादी उत्पादनांना ऑनलाइन व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मिळणार

Archana Banage

कर्नाटक सरकारने ६ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संप

Archana Banage

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बेंगळूरमध्ये कर्फ्यू

Archana Banage