Tarun Bharat

वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव, आमच्याकडे सबळ पुरावे

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा जगभर फैलाव झाला आहे. त्याचे आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनी केला आहे. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही असा दावा केला होता.
  

अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना माइक पॉम्पियो यांनी चीनवर आरोप केला आहे. माइक पॉम्पियो म्हणाले, वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा जगभर फैलाव झाला आहे. कोरोनाला रोखण्याची चीनला संधी होती. मात्र चीनने तसे केले नाही. चीनने कपटी भावनेने कोरोना पसरू दिला याचे अमेरिकेकडे सबळ पुरावे आहेत. जगभरात विषाणू परवण्यासाठी निन्म स्तरांतील प्रयोगशाळा सुरु करण्याचा चीनचा फार जुना इतिहास आहे, असेही ते म्हणाले. 

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा याचा तपास करत असून, त्यांनी मात्र, कोरोना मानवनिर्मित असल्याचा दावा फेटाळला आहे. 

Related Stories

बेस्ट कर्मचारी आजपासून 100 टक्के संपावर, कामगार कृती समिती निर्णयावर ठाम

Tousif Mujawar

इराक पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन हल्ला

Patil_p

रेपो रेट जैसे थे!

datta jadhav

आत्मनिर्भर भारतासाठी युवकांना प्रोत्साहन द्या : राज्यपाल

Archana Banage

उद्धव ठाकरेंची गिनीज बुकमध्ये नोंद; मंत्रालयातील उपस्थितीवरून रामदास कदमांचा टोला

Archana Banage

‘एमबीबीएस-फायनल’चे विद्यार्थी कोविड सेवेत ?

Patil_p