Tarun Bharat

वुहान शहर कोरोनामुक्त

Advertisements

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहर कोरोनामुक्त झाले आहे. वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. 

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वुहान कोरोनामुक्त झाले होते. मात्र, 36 दिवसांनंतर वुहानमध्ये पुन्हा नव्याने सहा रुग्ण आढळल्यानंतर तेथील आरोग्य प्रशासनाने शहरातील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वुहानमधील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. 

शुक्रवारी वुहानमधील शेवटचे तीन रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे वृत्त चीनमधील एका सरकारी वृत्तपत्राने दिले आहे. तरी देखील बुधवारी कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले 245 रुग्ण वुहानमध्ये असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 83 हजार 027 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 4634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

युक्रेनमध्ये अडकले कर्नाटकचे ४०६ विद्यार्थी

Sumit Tambekar

मिरजेत फळ विक्रेत्याला मारहाण करून रोकड लंपास

Abhijeet Khandekar

नव्या स्ट्रेनचे थैमान; ब्रिटनमध्ये एका दिवसात आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ

datta jadhav

हेमंत करकरेंना मी देशभक्त मानत नाही; साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त वक्तव्य

Rohan_P

धक्कादायक : वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

Rohan_P

G7 शिखर संमेलन लांबणीवर

datta jadhav
error: Content is protected !!