Tarun Bharat

वृद्धांची काळजी घेण्यात कर्नाटक सरकार असमर्थ

प्रतिनिधी/ बेळगाव

वृद्धांना वेळेवर योग्य ते औषधोपचार उपलब्ध करून देण्यामध्ये कर्नाटक राज्य अपयशी ठरले आहे. भारतात प्रथमच बहुआयामी आरोग्य सेवेबाबत तसेच सामाजिक आणि आर्थिक मुद्दय़ांवर राष्ट्रीय स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

कर्नाटकात 10 टक्के वृद्धांना उपचार मिळत नाहीत. सर्वेक्षणानुसार एकूण 72 हजार 259 वृद्धांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 31 हजार 500 व्यक्ती 60 वर्षावरील तर 6 हजार 749 व्यक्ती 75 वर्षावरील आहेत. सर्वेक्षणानुसार देशात 75 टक्के वृद्ध व्यक्ती एक किंवा अनेक विकारांनी त्रस्त आहेत. 40 टक्के जणांना 1 किंवा अनेक प्रकारचे अपंगत्व आहे. तर 20 टक्के जणांना मानसिक आरोग्याची तक्रार आहे.

40 टक्के लोकांना फुफ्फुसाचा विकार आहे. 5 पैकी एका वृद्धाला दैनंदिन जीवनात दुसऱयाची मदत घ्यावी लागते. तर 10 पैकी एकाला निद्रानाशाची समस्या आहे. अशा प्रकारचे सर्वेक्षण प्रथमच झाले असून, त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाची सर्व माहिती घेण्यात आली आहे. कर्नाटकात 45 वयावरील निम्म्याहून अधिक वृद्धांना फुफ्फुसाचा विकार आहे, तर 10 टक्के वृद्धांना फुफ्फुसाचा गंभीर विकार आहे.

राज्यात 60 वर्षावरील 1/3 व्यक्तींना दृष्टिदोष आणि श्रवण दोष आहे. ही आकडेवारी कर्नाटकात सर्वाधिक आहे. कर्नाटकातील वृद्ध उपचारासाठी खासगी आरोग्य सेवेवर अधिक अवलंबून आहेत. 60 टक्के वृद्धांना दररोजच्या कामकाजात किंवा हालचाली करण्यात त्रास होत असून, त्यापैकी 40 टक्के लोकांना दुसऱयाची मदत घ्यावी लागते. बहुसंख्य वृद्धांना कौटुंबिक वातावरणापासून वंचित राहावे लागते.

पाचपैकी एका वृद्ध व्यक्तीला अंघोळ करणे, कपडे घालणे, उठून बसणे या कृती करणे कठीण जाते. याशिवाय स्वच्छतागृहात जाणे ही वृद्ध व्यक्तींची मोठी समस्या आहे. 

Related Stories

देवदासींच्या पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज जाहीर करा

Amit Kulkarni

मराठा स्पोर्ट्स, स्टार इलेव्हनची विजयी सलामी

Amit Kulkarni

जिल्हा हॅण्डबॉल स्पर्धेत आरपीडी महाविद्यालयाला दुहेरी मुकुट

Amit Kulkarni

महिला आघाडीने घेतल्या महिला मंडळांच्या गाठीभेटी

Amit Kulkarni

चिकन-अंडय़ांच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

क्लोजडाऊन काळात खानापूर तालुक्मयात 150 हून अधिक विवाह समारंभ

Amit Kulkarni