Tarun Bharat

वृध्देला बोलण्यात गुंतवून 50 हजारांचा दागिना लंपास

साताऱयातील घटना – दोन अनोळखींवर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

साताऱयातील जुन्या मोटार स्टँड परिसरात एका वृध्द महिलेला दोन अनोळखींनी तुम्हाला धान्य पाहिजे का असे विचारले. नंतर त्यांच्या गळय़ातील सोन्याची माळ बटव्यात ठेवण्यास बोलण्यात गुंतवून 50 हजार रुपयांची सोन्याची माळ लंपास केल्याची घटना 15 रोजी सकाळी घडली आहे.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार गिरीजाबाई लालचंद तपासे (वय 80 रा. गुरुवार पेठ, सातारा) या दि. 15 रोजी जुन्या मोटार स्टँडवरील दर्ग्याच्या पाठीमागेत असलेल्या हॉटेलवरच्या पायरीवर बसल्या होत्या. त्यावेळी तिथे असलेल्या दोन अनोळखींनी त्यांना धान्य पाहिजे का असे विचारत संवाद वाढवला.

नंतर त्या दोघांनी त्यांना गळय़ात सोन्याची माळ काढून त्यांच्या कमरेच्या बटव्यात ठेवण्यास सांगितले. बोलण्यात गुंतवून नंतर त्यांनी बटव्यातील सोन्याची माळ घेवून तेथून पोबारा केला. ही बाब लक्षात आल्यावर गिरीजाबाई तपासे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून या चोरीचा अधिक तपास पोलीस हवालदार काशीद करत आहेत.

Related Stories

कोपार्डे येथे मरकज कार्यक्रमातील तरुण आल्याने तणाव

Abhijeet Shinde

कोरोना संदर्भात राज्यात एकूण १ लाख १० हजार गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच सुमारे पावणे चार लाखाचा ऐवज लंपास

Abhijeet Shinde

जयसिंगपूर शहरासाठी १०० बेडचे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करणार

Abhijeet Shinde

बाळूमामा ट्रस्ट रूग्णालयात होणार कोरोना हेल्थ केअर सेंटर : आमदार आबीटकर

Abhijeet Shinde

मुस्लिम बांधवांनो रमजानच्या काळात नमाज घरातच अदा करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!